Join us

IPL 2018 : IPL थांबवण्यासाठी BCCI विरोधात कोर्टात याचिका 

न्यायाधीशांच्या खंडपीठाने गृह मंत्रालय आणि बीसीसीआयला नोटीस पाठवण्याचे आदेश दिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 14:24 IST

Open in App

नवी दिल्ली -  आयपीएलच्या 11 व्या सत्राला दोन दिवसांनी सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच आयपीएलचे सामने थांबवण्यासाठी मद्रासच्या हायकोर्टात बीसीसीआय विरोधात आज याचिका दाखल करण्यात आली आहे. आयपीएस आधिकारी जी. सम्पतकुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे. सामन्यादरम्यान मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने हवी तशी योजना आखलेली नाही. त्यामध्ये कठोर उपाय योजना आखल्या नाहीत असा दावा जी. सम्पतकुमार  यांनी  याचिकेत केला आहे.  मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि न्यायाधीश ए सेलवम यांच्या खंडपीठाने गृह मंत्रालय आणि बीसीसीआयला नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत.  13 एप्रिल रोजी या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे.  

मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीमुळं सामने थांबवता येणार नाही असे मत दोन न्यायाधिशाच्या खंडपीठाने व्यक्त केलं. यावर जी. सम्पतकुमार म्हणाले की, सामने थांबवण्याचा माझा कोणताही हेतू नाही. पण सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंग हा एकप्रकारचा गुन्हाच आहे. त्यावर आळा घालण्यासाठी योग्य त्या उपायोजना आखल्या गेल्या पाहिजेत. 2015 मध्ये मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर चेन्नई आणि राजस्थान संघावर दोन वर्षाची बंदी घातली होती. सात एप्रिलपासून सुरु होत असलेल्या आयपीएलच्या धडाक्याकडे जगभरातील क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागले आहे. एकाच वेळी जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू एकमेकांविरुद्ध भिडणार असल्याने गेल्या दशकभरापासून कायम असलेली उत्सुकता यंदा त्याहून अधिक शिगेला पोहचली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, जसप्रीत बुमराह या दिग्गजांसह 19 वर्षांखालील युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :आयपीएल 2018उच्च न्यायालयबीसीसीआय