Join us

IPL 2018 : हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळं मुंबईच्या सामन्याला मुकला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 16:36 IST

Open in App

हैदराबाद - हैदराबादचा संघ गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आयपीएल 11 मध्ये चार विजयासाह सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळं मुंबईच्या सामन्याला मुकला होता. त्यात आणखी एका गोलंदाजाची भर पडली आहे. हैदराबद संघाचा मुख्य आधारस्तंभ असलेला बिली स्टॅनलेक स्पर्धेतून बाद झाला आहे. 23 वर्षीय बिली स्टॅनलकेच्या बोटाला दुखापत झाल्याने तो पुढील उपचारासाठी मायदेशी परतला आहे. चेन्नई विरोधात झालेल्या सामन्यात स्टॅनलेकच्या बोटाला दुखापत झाली होती. 

हैदराबाद संघासाठी भुवनेश्वरकुमारसह बिली स्टॅनलकेने सनरायझर्सच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळली होती. त्याने पाच सामन्यात सहा बळी घेतले आहेत. 12 एप्रिल रोजी  हैदराबाद येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध  झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एक धाव हवी असताना त्याने चौकार खेचत सनरायझर्सला विजय मिळवून दिला होता. वॉर्नरच्या अनुपस्थितीत केन विल्यमसनच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची या स्पर्धेतील कामगिरी संमिश्र झाली आहे. 

टॅग्स :आयपीएल 2018सनरायझर्स हैदराबाद