मुंबई- आयपीएलच्या 11व्या पर्वाच्या अंतिम सामन्याचा महामुकाबला सुरू आहे. त्यातील बरेच खेळाडू या सामन्यात उत्तम कामगिरी करत आहेत. तर काहींना मैदानावर म्हणावी तशी चमक दाखवता आलेली नाही. चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रोहानं काहीसा असाच नवा रेकॉर्ड स्वतःच्या नावे केला आहे.
34 वर्षांच्या कॅरेबियन खेळाडू ड्वेन ब्राव्होनं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतलेल्या चेन्नईच्या टीमनं ब्राव्होला 6.40 कोटी रुपयांमध्ये पुन्हा संघासाठी खरेदी केले. खरं तर ब्राव्हो आयपीएलच्या या पर्वात सर्वाधिक धावा देणारा नंबर एकचा गोलंदाज बनला आहे. त्यानं उमेश यादवला पछाडत स्वतःच्या नावे हा लाजिरवाणा रेकॉर्ड केला आहे.
ब्राव्होनं या पर्वात 321 चेंडूंमध्ये 533 धावा दिल्या आहेत. रविवारी सनरायझर्स हैदराबादविरोधात खेळणा-या ब्राव्होनं एक बळी मिळवला. परंतु चार षटकांत त्याला 46 धावा झोडल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 11.50पर्यंत राहिला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज
533 धावा, ड्वेन ब्रावो (2018)
508 धावा, उमेश यादव (2013)
507 धावा, मिशेल मॅक्लेघन (2017)
504 धावा, सिद्धार्थ कौल (2018)
497 धावा, ड्वेन ब्रावो (2013)
494 धावा, ड्वेन ब्रावो (2016)
सद्यस्थितीत ब्राव्होनं 16 सामन्यांत 14 बळी मिळवले आहेत. त्याच वेळी ब्राव्होचा गोलंदाजीची सरासरी 38.07 अशी आहे. तर त्याचा इकॉनॉमी रेट 9.96 राहिला आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत त्यानं 141 धावा बनवल्या आहेत.