Join us

IPL 2018 : धोनी आणि कोहलीची सामन्यापूर्वी गळाभेट

सामन्यापूर्वी हे दोघे जेव्हा मैदानात भेटले तेव्हा मात्र त्यांच्यामधली मैत्री साऱ्यांना पाहता आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 19:29 IST

Open in App
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता, अशी चर्चा होती. या गळाभेटीने या दोघांनीही या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

बंगळुरु : बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकमेकांसमोर आयपीएलच्या सामन्यासाठी उभे ठाकले आहेत. म्हणजेच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली एकमेकांविरोधात जिंकण्याच्या ईर्षेने मैदानात उतरणार होते. पण सामन्यापूर्वी हे दोघे जेव्हा मैदानात भेटले तेव्हा मात्र त्यांच्यामधली मैत्री साऱ्यांना पाहता आली.

सामन्यापूर्वी दोन्ही संघ मैदानात सराव करत होते. त्यावेळी सरावानंतर हे दोन्ही कर्णधार एकमेकांना भेटले. फक्त यावरच हे दोघे थांबले नाहीत तर त्यांनी गळाभेटही घेतली. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता, अशी चर्चा होती. या गळाभेटीने या दोघांनीही या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

टॅग्स :आयपीएल 2018विराट कोहलीमहेंद्रसिंह धोनी