Join us

IPL 2018 : ' या ' धमकीमुळे चेन्नईतील सामने पुण्याला स्थलांतरीत केले

कावेरी पाणी प्रश्नावरून तामिळनाडूमध्ये वातावरण बिघडू शकते, असा अंदाज येथील काही राजकारण्यांना होता. त्यामुळे त्यांनी आयपीएलचे सामने चेन्नईमध्ये खेळवण्यासाठी विरोध दर्शवला होता. पण बीसीसीआय आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाने राजकारण्यांची गोष्ट गंभारपणे घेतली नव्हती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 17:52 IST

Open in App
ठळक मुद्देचेन्नईतील तमिझागा वझुवुरिमाई काची या स्थानिक पक्षाने कावेरी पाणी प्रश्नासंदर्भात उग्र रुप धारण केले होते. त्यांनी चेन्नईतील सामने थांबवण्याची धमकी दिली होती.

चेन्नई : तब्बल दोन वर्षांनी चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये पुनरागमन केले. पण या हंगामात आपल्या मैदानात त्यांना फक्त दोनच सामने खेळता आले. कारण कावेरी पाणी वाटप प्रश्नावरुन चेन्नईतील वातावरण पेटले होते, त्यामुळे चेन्नईतील सामने पुण्याला स्थालांतरीत करण्यात आले. हे सामने एका धमकीमुळे स्थलांतरीत करण्यात आले.

कावेरी पाणी प्रश्नावरून तामिळनाडूमध्ये वातावरण बिघडू शकते, असा अंदाज येथील काही राजकारण्यांना होता. त्यामुळे त्यांनी आयपीएलचे सामने चेन्नईमध्ये खेळवण्यासाठी विरोध दर्शवला होता. पण बीसीसीआय आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाने राजकारण्यांची गोष्ट गंभारपणे घेतली नव्हती. पण चेन्नईतील दुसऱ्या सामन्यात आंदोलकांनी खेळाडूंवर बूट फेकला होता. त्यानंतर बीसीसीआयने चेन्नईतील सामने पुण्याला स्थालांतरीत करण्याचा निर्णय घेतला.

चेन्नईतील तमिझागा वझुवुरिमाई काची या स्थानिक पक्षाने कावेरी पाणी प्रश्नासंदर्भात उग्र रुप धारण केले होते. त्यांनी चेन्नईतील सामने थांबवण्याची धमकी दिली होती. ' जर चेन्नईतील सामने रद्द करण्यात आले नाहीत, तर आम्ही स्टेडियममध्ये साप सोडू, ' अशी धमकी या पक्षाने दिली होती. त्यानंतर चेन्नईच्या संघाचे मालक एन. श्रीनिवासन, बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल यांनी चेन्नईतील सामने पुण्याला खेळवण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :आयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्स