Join us

IPL 2018 : दुसऱ्यांदा होणार आयपीएलच्या कार्यक्रमात बदल

आता कर्नाटकमध्ये निवडणूका होणार असल्याने आयपीएलच्या कार्यक्रमामध्ये दुसऱ्यांदा बदल करण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:39 IST

Open in App
ठळक मुद्देपहिल्यांदा चंदीगढ आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु असल्यामुळे आयपीएलच्या कार्यक्रमात पहिल्यांदा बदल करावा लागला होता.

 नवी दिल्ली : आयपीएलच्या कार्यक्रमात आता दुसऱ्यांदा बदल करण्यात येणार असल्याचे समजते. पहिल्यांदा चंदीगढ आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु असल्यामुळे आयपीएलच्या कार्यक्रमात पहिल्यांदा बदल करावा लागला होता. आता कर्नाटकमध्ये निवडणूका होणार असल्याने आयपीएलच्या कार्यक्रमामध्ये दुसऱ्यांदा बदल करण्यात येणार आहे.

कर्नाटकमध्ये 12 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी कर्नाटकमध्ये यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यामध्ये सामना होणार होता. पण कर्नाटकमध्ये निवडणूक होणार असल्यामुळे आता हा सामना दिल्लीतील फिरोझशाह कोटला मैदानात हलवण्यात येणार आहे. त्यामुळे आता बंगळुरुला हा सामना 21 मे या दिवशी देण्यात येणार आहे.

यापूर्वी आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या प्रशासकांनी बदल करायचे सुचवले होते. त्यानुसार आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये बीसीसीआयला काही बदल करावे लागले होते. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या सामन्यांच्या कार्यक्रमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

टॅग्स :आयपीएल 2018