Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2018 : विराटच्या ' या ' कॅचवर भाळली अनुष्का शर्मा

पराभवाने बंगळुरुचा कर्णधार निराश झाला असला तरी त्याची ही निराशा फारच कमी काळ राहीली. कारण या सामन्यात जो कोहलीने एक झेल पकडला ते पाहून त्याच्यावर अनुष्का शर्मा पुन्हा एकदा भाळली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 17:49 IST

Open in App
ठळक मुद्देकोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकचा त्याने सूर मारत झेल टीपला. या झेलचा अनुष्काला चांगलाच आनंद झाला. 

बंगळुरु : रविवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्याच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवाने बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली निराश झाला असला तरी त्याची ही निराशा फारच कमी काळ राहीली. कारण या सामन्यात जो कोहलीने एक झेल पकडला ते पाहून त्याच्यावर अनुष्का शर्मा पुन्हा एकदा भाळली. 

बंगळुरुला या सामन्यात सहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. पण कोहलीने 68 धावांची खेळी साकारत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षण करतानाही कोहलीने आपली भूमिका चोख बजावली. कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकचा त्याने सूर मारत झेल टीपला. या झेलचा अनुष्काला चांगलाच आनंद झाला. 

कोलकात्याला सामना जिंकण्यासाठी आठ चेंडूंमध्ये पाच धावांची गरज होती. यावेळी एखादा मोठा फटका मारत सामना लवकर संपवावा, असा कार्तिकने विचार करत मोठा फटका लगावला. या फटक्यामध्ये कार्तिकने ताकद कमी लावली होती. त्यामुळे हा चेंडू सीमारेषेपार जाणार नव्हता. पण चौकार मिळेल, असे कार्तिकला वाटत होते. पण कोहलीने सूर लगावत हा चेंडू झेलला आणि कार्तिकला तंबूची वाट धरावी लागली.

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकोलकाता नाईट रायडर्स