Join us  

IPL 2018 : शिखर धवनला केली अंकित राजपूतने शिवीगाळ

हैदराबादचा सलामीवीर शिखर धवनला बाद केल्यावर अंकितने शिवीगाळ केली आणि त्यामुळे सध्या तो टीकेचा धनी ठरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 5:57 PM

Open in App
ठळक मुद्देधवन पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असताना अंकितने त्याला शिव्या दिल्या. हे वर्तन सभ्य माणसांचा खेळ म्हणवणाऱ्या क्रिकेटला शोभेसं नक्कीच नाही. त्यामुळेच समाजमाध्यमांवर अंकितवर जोरदार टीका होत आहे.

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादच्या पाच फलंदाजांना बाद करत किंग्ज इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज अंकित राजपूतने गुरुवारच्या आयपीएलच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. पराभवानंतरही त्याच्यावर संघाची मालकिण प्रीती झिंटाने त्याची स्तुती केली. पण हैदराबादचा सलामीवीर शिखर धवनला बाद केल्यावर अंकितने शिवीगाळ केली आणि त्यामुळे सध्या तो टीकेचा धनी ठरत आहे.

अंकितने पहिल्या षटकात हैदबादचा कर्णधार केन विल्यमसनला बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकात धवनने दोन चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर धवनला अकरा धावांवर असताना अंकितने करुण नायरकरवी झेलबाद केले. धवन पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असताना अंकितने त्याला शिव्या दिल्या. हे वर्तन सभ्य माणसांचा खेळ म्हणवणाऱ्या क्रिकेटला शोभेसं नक्कीच नाही. त्यामुळेच समाजमाध्यमांवर अंकितवर जोरदार टीका होत आहे.

टॅग्स :आयपीएल 2018सनरायझर्स हैदराबादकिंग्ज इलेव्हन पंजाबशिखर धवन