Join us

IPL 2018: विराट कोहली बंगळुरुला पहिले जेतेपद जिंकवून देणार का?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएलच्या दहा सत्रामध्ये एकदाही जेतेपदाला मिळाले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 16:24 IST

Open in App

मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएलच्या दहा सत्रामध्ये एकदाही जेतेपदाला मिळाले नाही.  विराट कोहलीसारखे आक्रमक नेतृत्व असतानाही बंगळुरुला आणखी पहिल्या जेतेपदाची प्रतिक्षा आहे.  यावेळी विराट कोहली बंगळुरुच्या चाहत्याला जल्लोष साजरा करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करेल.  हा संघ आयपीएलमध्ये सर्वात बलाढ्य आणि संतुलील आहे. बंगळुरुमध्ये प्रत्येक सत्रात स्टार खेळाडूंचा भरणा पहायला मिळतो. गेल्या दहा वर्षात बंगळुरुने आंतिम चार संघात पाच वेळा प्रवेश मिळवला आहे. बंगळुरुच्या संघाने तीन वेळा (2009, 2011 आणि 2016)  अंतिम सामन्यात धडक मारली आहे. पण एकदाही विजय साकार करता आला नाही. यावेळी विराट कोहली बंगळुरु संघाला आयपीएलचा खिताब मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. 

बलस्थाने - 

तुफान फॉर्ममध्ये असलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या हातात पुन्हा एकदा बंगळुरु संघाची कमान आहे.  विराट कोहलीच बंगळुरुची सर्वात मोठी ताकत आहे. विराटने आयपीएलच्या एका सत्रात चार शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. विराट कोहलीसह एबी डिव्हिलियर्स, मॅक्युलम, डीकॉक, ख्रिस वोक्स यांची कामगिरी बंगळुरु संघाची ताकद आहे.  युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या  फिरकी  जोडीला उमेश यादव आणि टिम साऊदी ही वेगवान मारा करणारी जोडी असेल. कोरी अंडरसन, कॉलिन डि ग्रँडहोमी आणि ख्रिस वोक्स सारखे तगडे अष्टपैलू खेळाडू आहेत.   या खेळाडूकडे असेल लक्ष -  विराट कोहलीला खेळताना पाहणे सर्वांना आवडते, त्यामुळं विराट कोहली कसा खेळतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विराट कोहलीवर बंगळुरु संघाची भिस्त असणार आहे. टी-20मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये विराट पहिल्या पाचमध्ये आहे. एकहाती सामना फिरवून देण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. कोहलीने आयपीएलच्या 149 सामन्यात  4418 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.  

असा आहे संघ : विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्स, युजवेंद्र चहल, उमेश यादव,  मॅक्कुलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्विंंटन डी कॉक, मोहम्मद सिराज, कोरी अंडरसन, कोलिन डी ग्रांडहोम, मुरुगुन अश्विन, पार्थिव पटेल, मोइन अली, मनदीप सिंह, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साउदी, कुलवंत खेजोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे, अनिरुद्ध अशोक जोशी.  

टॅग्स :आयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर