Join us  

IPL 2018 MI VS DD: दिल्लीचा 'रॉय'ल विजय... शेवटच्या चेंडूवर हरली मुंबई

आधीच्या दोन सामन्यांप्रमाणेच शेवटच्या क्षणी मुंबई पराभूत झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 3:52 PM

Open in App

मुंबईः मुंबई इंडियन्सचं १९५ धावांचं महाकठीण आव्हान जिद्दीनं पार करत दिल्ली डेअरडेविल्सनं आयपीएल-११ मध्ये विजयाचा श्रीगणेशा केला. ५३ चेंडूत नाबाद ९१ धावांची जिगरबाज खेळी करणारा जेसन रॉय दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. आधीच्या दोन सामन्यांप्रमाणेच शेवटच्या क्षणी मुंबई पराभूत झाली. त्यामुळे त्यांना गुणांचं खातं उघडण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

सूर्यकुमार, लुईस आणि ईशान किशन यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर मुंबईनं २० षटकांत १९४ धावा फटकावल्या होत्या. मुस्तफिझूर रेहमान, जसप्रित बुमराह, मयांक मार्कंडे असे तगडे गोलंदाज मुंबईकडे असल्यानं सामन्याचं पारडं त्यांच्याकडे झुकलं होतं. परंतु, पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत पीचवर टिच्चून उभं राहत जेसन रॉयनं त्यांचं विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं. सुरुवातीला चौकार, षटकारांची आतषबाजी करणाऱ्या रॉयनं मधल्या ओव्हरमध्ये सावध पवित्रा घेऊन विकेट टिकवली आणि तोच दिल्लीला विजयापर्यंत घेऊन गेला. ऋषभ पंतच्या २५ चेंडूतील ४७ धावांनीही दिल्लीच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. 

 MI VS DD Live अपडेट

19.39 : जेसन रॉयच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर दिल्लीचा मुंबईवर सात विकेट्स राखून सनसनाटी विजय... शेवटच्या चेंडूवर मुंबई हरली...

19.38 : दिल्लीचा विजयाचा श्रीगणेशा... मुंबईची पराभवाची हॅटट्रिक...

19.29 : मुंबई की दिल्ली?... शेवटच्या षटकांत दिल्लीला ११ धावा...

19.23 : १८ षटकांत दिल्लीच्या ३ बाद १७९ धावा...

19.19 : दिल्लीला शेवटच्या तीन षटकांत विजयासाठी हव्यात २४ धावा

19.14 : १६ षटकांत  दिल्लीच्या ३ बाद १६० धावा...

19.08 : दिल्लीच्या १५ षटकांत ३ बाद १४८ धावा...

19.02 : दिल्लीला तिसरा धक्का... 'डेंजर' ग्लेन मॅक्सवेल १३ धावांवर बाद...

19.00 : दिल्लीची १०ची सरासरी कायम... १३ षटकांत दोन बाद १३४ धावा...

18.55 : फटकेबाजीच्या नादात ऋषभ पंत बाद... २५ चेंडूत तडकावल्या ४७ धावा...

18.49 : जेसन रॉयचं अर्धशतक... २७ चेंडूत फटकावल्या ५१ धावा...

18.45 : दिल्लीची 'शंभरी' पूर्ण... दहाव्या षटकांतच ओलांडला १०० धावांचा टप्पा...

18.41 : ऋषभ पंत - जेसन रॉयची जोडी जमली... ९ षटकांनंतर दिल्लीच्या १ बाद ८५ धावा...

18.31 : सात षटकांनंतर दिल्लीच्या १ बाद ६३ धावा...

18.23 : दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर १५ धावा करून तंबूत... मुस्तफिजुरचा मुंबईच्या मदतीला धावला... 

18.22 : हार्दिक पंड्याची पुन्हा धुलाई, गंभीर-रॉयने कुटल्या २२ धावा... 

18.20 : दिल्लीच्या ५० धावा पूर्ण... जेसन रॉयची फटकेबाजी...

18.16 : मुस्तफिजुरच्या गोलंदाजीपुढेही दिल्लीचे सलामीवीर निष्प्रभ... ४ षटकांत २९ धावा...

18.11 : जसप्रीत बुमराहचा टिच्चून मारा... तिसऱ्या ओव्हरमध्ये दिल्लीला फक्त दोन धावा...

18.06 : दिल्लीच्या दोन षटकांत २३ धावा...

18.05 : दिल्लीचीही धडाकेबाज सुरुवात... जेसन रॉय फॉर्मात

18.01: हार्दिक पंड्याच्या पहिल्याच षटकांत दिल्लीच्या ११ धावा...

17.57 :  दिल्लीचा डाव सुरू... गौतम गंभीर आणि जेसन रॉय सलामीला...

>> मुंबईचं दिल्लीपुढे विजयासाठी १९५ धावांचं आव्हान

>> मुंबईचं द्विशतकाचं स्वप्न अधुरं... २० षटकांत ७ बाद १९४ धावा...

>> OUT हार्दिक पंड्याही अपयशी... अवघ्या दोन धावा करून बाद...

>> १९ षटकांनंतर मुंबई इंडियन्स ६ बाद १८७ धावा...

>> कृणाल पंड्याचा फटका चुकला... ११ धावा करून तंबूत परतला...

>> १८ षटकांनंतर मुंबई इंडियन्स ५ बाद १८३... पंड्या बंधू मैदानात...

>>OUT रोहित शर्मा १८ धावांवर बाद... मुंबईचा अर्धा संघ तंबूत 

>> १७ षटकांनंतर मुंबई इंडियन्स ४ बाद १७६

>>OUT किरॉन पोलार्डचा भोपळा... डॅन ख्रिस्टियनच्या गोलंदाजीवर त्रिफळा...

>>OUT ईशान किशन ४४ धावांवर बाद...

>> १५ षटकांत मुंबई इंडियन्स २ बाद १५८... 

>> ईशान किशनची फटकेबाजी, ५ चौकार आणि २ षटकारांचा धमाका...

>> राहुल तेवतियाची धुलाई... १३ व्या षटकात १९ धावा तडकावल्या... मुंबई २ बाद १४१ धावा...

>> १२ षटकांनंतर मुंबईच्या २ बाद १२२ धावा 

>> मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर... ईशान किशनसोबत भागीदारी आवश्यक...

>>OUT मुंबईचे दोन्ही सलामीवीर तंबूत... ३२ चेंडूत ५३ धावांची खेळी करून सूर्यकुमार बाद...

>> दहा षटकांत मुंबईच्या १ बाद १०७ धावा...

>> सलामीवीर सूर्यकुमारचं अर्धशतक... २९ चेंडूत ५० धावांची खेळी... 

>> OUT एविन लुईसचं अर्धशतक थोडक्यात हुकलं... २८ चेंडूत ४८ धावां करून माघारी...

>> ८.३ षटकांत मुंबई इंडियन्सचं शतक... लुईसच्या उत्तुंग षटकारानं मुंबईच्या १०० धावा पूर्ण...

>> दिल्लीला थोडा दिलासा... दोन षटकांत मुंबईचा धावांचा वेग मंदावला... आठ ओव्हरनंतर मुंबई बिनबाद ९२... 

>> लुईसचेही धुमशान... १६ चेंडूत ३७ धावा... मुंबई ६ षटकांत ८४ धावा...

>> सूर्यकुमारच्या २० चेंडूत ४१ धावा... पाच ओव्हरनंतर मुंबई बिनबाद ६६ धावा... 

>> मुंबई इंडियन्सच्या ४ षटकांत ५२ धावा... वानखेडेवर चौकार, षटकारांची आतषबाजी...

>> सूर्यकुमार - लुईसची जोडी जमली... दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई...

>> मुंबई इंडियन्सची खणखणीत सुरुवात... ३ षटकांत ४० धावांचा पाऊस...

>> दिल्लीचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय... 

टॅग्स :आयपीएल 2018मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स