मुंबई - सर्वांना उत्सुकता लागलेल्या आयपीएलच्या 11 व्या हंगामातील सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक अखेर आज प्रसिद्ध झाले आहे. आयपीएल-11 चा थरार 7 एप्रिलपासून रंगणार असून, 27 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. 7 एप्रिल रोजी होणाऱ्या सलामीच्या सामन्यात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जचे संघ आमने-सामने येणार आहेत. आयपीएल-2018 चा यंदाचा हंगाम एकूण 51 दिवस चालणार आहे.
स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणानंतर दोन वर्षांची बंदीची शिक्षा भोगून चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या संघांनी केलेले पुनरागमन हे आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा संघ चेन्नईमध्ये तर राजस्थानचा संघ जयपूरमध्ये आपले घरच्या मैदानावरील सामने खेळणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ आपले तीन सामने इंदूर येथे तर 4 सामने मोहालीमध्ये खेळेल. प्रत्येक संघ 14 साखळी सामने खेळणार असून, त्यातील सात सामने घरच्या तर सात सामने दुसऱ्या मैदानावर होतील. गुणतक्त्यातील अव्वल 4 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.
पाहा स्पर्धेतील सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक
1) मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज - 7 एप्रिल, मुंबई
2) दिल्ली डेअसडेव्हिलस वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 8 एप्रिल, दिल्ली
3) कोलकाता नाईटरायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 एप्रिल - कोलकाता
4) सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स - 9 एप्रिल, हैदराबाद
5) चेन्नई सुपरकिंग्ज वि. कोलकाता नाईटरायडर्स - 10 एप्रिल, चेन्नई
6) राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली डेअरडेव्हिलस - 11 एप्रिल, जयपूर
7) सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स - 12 एप्रिल, हैदराबाद
8) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 13 एप्रिल, बंगळुरू
9) मुंबई इंडियन्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 14 एप्रिल, मुंबई
10) कोलकाता नाईटरायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 14 एप्रिल, कोलकाता
11) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स - 15 एप्रिल, बंगळुरू
12) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 15 एप्रिल, इंदूर
13) कोलकाता नाईटरायडर्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल- 16 एप्रिल, कोलकाता
14) मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर बंगळुरू - 17 एप्रिल, मुंबई
15) राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 18 एप्रिल, जयपूर
16) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैदराबाद- 19 एप्रिल, इंदूर
17) चेन्नई सुपरकिंग्ज वि. राजस्थान रॉयल्स - 20 एप्रिल, चेन्नई
18) कोलकाता नाईटरायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब -21 एप्रिल, कोलकाता
19) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 21 एप्रिल, दिल्ली
20) सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 22 एप्रिल, हैदराबाद
21) राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स - 22 एप्रिल, जयपूर
22) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 23 एप्रिल, इंदूर
23 मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 24 एप्रिल, मुंबई
24) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 25 एप्रिल, बंगळुरू
25) सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 26 एप्रिल, हैदराबाद
26) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 27 एप्रिल, दिल्ली
27) चेन्नई सुपरकिंग्ज वि. मुंबई इंडियन्स - 28 एप्रिल. चेन्नई
28) राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 29 एप्रिल, जयपूर
29) रॉयल चॅलेंजर बंगळुरू वि. कोलकाता नाइटरायडर्स - 29 एप्रिल, बंगळुरू
30) चेन्नई सुपरकिंग्ज वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 30 एप्रिल, चेन्नई
31) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स - 1 मे, बंगळुरू
32) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. राजस्थान रॉयल्स - 2 मे, दिल्ली
33) कोलकाता नाईटरायडर्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 3 मे, कोलकाता
34) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स - 4 मे, मोहाली
35) चेन्नई सुपरकिंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 5 मे, चेन्नई
36) सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 5 मे, हैदराबाद
37) मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स - 6 मे, मुंबई
38) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स - 6 मे, मोहाली
39) सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 7 मे, हैदराबाद
40) राजस्थान रॉयल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 8 मे, जयपूर
41) कोलकाता नाईटरायडर्स वि. मुंबई इंडियन्स - 9 मे, कोलकाता
42) दिल्ली डेअरडेव्हिस वि. सनरायझर्स हैदराबाद - 10 मे, दिल्ली
43) राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 11 मे, जयपूर
44) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाइटरायडर्स - 12 मे, मोहाली
45) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स - 12 मे, बंगळुरू
46) चेन्नई सुपरकिंग्ज वि. सनरायझर्स हैदराबाद - 13 मे, चेन्नई
47) मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - 13 मे, मुंबई
48) किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 14 मे, मोहाली
49) कोलकाता नाईटरायडर्स वि. राजस्थान रॉयल्स - 15 मे, कोलकाता
50) मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 16 मे, मुंबई
51) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद - 17 मे, बंगळुरू
52) दिल्ली डेअरडेव्हिस वि. चेन्नई सुपरकिंग्ज - 18 मे, दिल्ली
53) राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 19 मे, जयपूर
54) सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइटरायडर्स - 19, हैदराबाद
55) दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स - 20 मे, दिल्ली
56) चेन्नई सुपरकिंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब - 20 मे, चेन्नई
क्वालिफायर/ एलिमिनेटर फेरी
57) क्वालिफायर 1 - 22 मे, मुंबई
58) एलिमिनेटर - 23 मे
59) क्वालिफायर 2 - 24 मे
60 अंतिम लढत - 27 मे, मुंबई