Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2018- पंजाबी रंगात रंगला ख्रिस गेल, भांगडा करतानाचा व्हिडीओ केला शेअर

किग्ज इलेव्हन पंजाब या संघात आल्यानंतर ख्रिस गेल पंजाबी रंगात रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 13:40 IST

Open in App

मुंबई- इंडियन प्रीमियर लीगचं 11 वा सिझन 7 एप्रिलपासून सुरू होतं आहे. आयपीएलच्या या नव्या सिझनसाठी ज्याप्रमाणे चाहते उत्सुक आहेत त्याच प्रमाणे क्रिकेटरही उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं आहे. हीच उत्सुकता वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गेलने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे. क्रिकेटर ख्रिस गेलकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. ख्रिस गेल यावर्षी रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूकडून नाही तर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार आहे. यासाठी ख्रिस गेल अतिशय उत्साही आहे. आयपीएलच्या या अकराव्या सिझनची सुरूवात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याने होणार आहे. 

गेल लवकरच भारतात येणार असून त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्टकरून याबद्दलची माहिती दिली आहे. किग्ज इलेव्हन पंजाब या संघात आल्यानंतर ख्रिस गेल पंजाबी रंगात रंगला आहे. त्याने एका पंजाबी गाण्यावर नाचतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अतिशय व्हायरल झाला आहे. सहा तासात या व्हिडीओला 18 हजारपेक्षा जास्त लाइक्स व दोन हजारहून अधिक शेअर मिळाले आहेत. 

ख्रिस गेल 'बागी 2' या सिनेमातील गाँ 'मुंडिया' वर थिरकताना दिसतो आहे. ख्रिसचा डान्स सुरू असताना मागून एक व्यक्ती किंग्ज इलेव्हन पंजाबचं नाव घेताना ऐकु येत आहे. आयपीएल ऑक्शनमध्ये क्रिस गेलला दोन करोड रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने विकत घेतलं. 

टॅग्स :आयपीएल 2018