Join us  

Women;s Day Special: गोवन गर्ल’ शिखाने जिंकला विश्वास, जाणून घ्या तिची गोष्ट खास!

International Women's Day : जागतिक महिला दिनी म्हणजे ८ मार्च रोजीच भारतीय महिला संघाचा विश्वचषकातील अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यातील विजय महिलांकडून मिळणारी अभूतपूर्व अशी मोठी भेट ठरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 11:40 AM

Open in App

 -सचिन कोरडे जागतिक महिला दिनी म्हणजे ८ मार्च रोजीच भारतीय महिला संघाचा विश्वचषकातील अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यातील विजय महिलांकडून मिळणारी अभूतपूर्व अशी मोठी भेट ठरेल. टी-२० विश्वचषकात भारताने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठल्यानेही या स्पर्धेची अधिक उत्सुकता लागली आहे. भारतीय महिलांनी ज्या पद्धतीने खेळ केला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे कौतुक गोव्याच्या शिखा पांडे हिचेही होत आहे. कारण भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व सध्या शिखा पांडे हिच्याकडे आहे. झुलन गोस्वामी निवृत्त झाल्यानंतर कोण? असा प्रश्न निवडकर्त्यांपुढे होता. तो प्रश्न शिखाने सोडविला. शिखा ही अष्टपैलू खेळाडू आहे. क्षेत्ररक्षणातही ती चोख आहे. त्यामुळे तिच्यासारखा उत्तम पर्याय निवडकर्त्यांपुढे नव्हता. त्यामुळे गोलंदाजीचे नेतृत्व शिखाकडे सोपविण्यात आले आणि तिने ते सिद्धही केले. 

विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार

अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; मग कोणाला मिळेल जेतेपद?

ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजी धुमाकूळ घालत आहे. कधी पूनम, कधी राधा तर कधी राजश्री गायकवाड. भारतीय संघाची संपूर्ण भिस्त फिरकीवर आहे. अशा वेळी केवळ शिखावर वेगवान गोलंदाज म्हणून मोठी जबाबदारी आहे. भारतीय वायू सेनेत अधिकारी म्हणून पदावर असलेल्या शिखाने ऑस्ट्रेलियन खेळपट्टीचा चांगलाच अंदाज घेतला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शिखाने बेथ मूनी हिला बाद करीत ते दाखवून दिले होते. या सामन्यात तिने ३.५ षटकांत १४ धावांत ४ बळी घेतले होते.

सरावाची सुरुवात भारतीय संघाने उत्तम केली. त्यानंतर दुसºया सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शिखाने ४-०-१४-२ अशी कामगिरी केली होती. तिने एमिलिया केर हिला १६ व्या षटकांत ज्या पद्धतीने बाद केले तेव्हा भारतीय गोलदांजी कुठेही कमी पडणार नाही, हे स्पष्ट झाले. या सामन्यात दुसऱ्या बाजूने न्यूझीलंड विजयासाठी प्रयत्न करीत होता अशा वेळी शिखाने मिळवून दिलेले दोन्ही बळी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरले. 

वडिलांकडून प्लास्टिकची बॅट...शिखाला कोणतीही गोष्ट सहज मिळाली नाही. तिला यशासाठी मेहनत करावी लागली. कष्टावर तिचाही पूर्ण विश्वास आहे. ती शाळेतही हुशार विद्यार्थिनी होती. केंद्रीय विद्यालयात ती शिकली. दहाव्या वर्गात तिने गोव्यात तिसरा क्रमांक पटकाविला होता. तेव्हा आपली मुलगी शिक्षणातून खूप पुढे जाईल, असे आईवडिलांना वाटत होते. मात्र, तिने क्रिकेट हे करिअर निवडले. कारण या खेळावर तिचे अधिक प्रेम होते. दहाव्या वर्गानंतर तीन वर्षांत तिने आपल्या खेळात खूप सुधारणा केल्या. राज्याकडून प्रतिनिधित्व करताना बरेच काही मिळवून दिले. लहान असताना तिच्या वडिलांनी तिला प्लास्टिकचा बॉल आणि बॅट आणून दिली तेव्हापासून तिने बॅट सोडली नाही.

वडील सुभाष पांडे हे केंद्रीय विद्यालयात निवृत्त शिक्षक आहेत. त्यांनी मुलींसाठी क्रिकेट शिबिरे आयोजित केली होती. त्यात शिखाचाही सहभाग असायचा. आपली मुलगी क्रिकेट चांगली खेळते हे त्यांना समजल्यानंतर सुभाष यांनी शिखाला पूर्ण प्रोत्साहन दिले. शिखाने राज्य, विभाग आणि राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली गोमंतकीय खेळाडू ठरली. तिला प्रतिष्ठेचा गोवा राज्याचा ‘दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्कार’ही मिळालेला आहे. क्रिकेटर म्हणून हा पुरस्कार मिळवणारी ती एकमेव गोमंतकीय आहे.

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकजागतिक महिला दिन