Join us  

टी-२० विश्वचषक लांबणीवर

टी-२० विश्वचषक रद्द करावा का याबाबत आयसीसीत अंतर्गत चर्चा सुरु झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 12:08 AM

Open in App

दुबई : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे जगभरातील अनेक लहानमोठ्या क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वर्षाअखेर आॅक्टोबरमध्ये आॅस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेबद्दल आयसीसीने अद्याप कोणतीही भूमिका घेतली नव्हती. मात्र आयपीएल सारखी महत्वाची स्पर्धा आता होण्याची शक्यता मावळली असताना आयसीसीही टी-२० विश्वचषकाचे आयोजन २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याच्या विचारात आहे.

बीसीसीआयनेही आयपीएल आणि अन्य महत्वाच्या स्पर्धांचे आयोजन लांबवले आहे. यंदा भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा देखील विदेशी पर्यटकांना आॅस्ट्रेलियाकडून सहा महिने प्रवासबंदीच्या निर्णयानंतर अधांतरी सापडला आहे. यानंतर आॅस्ट्रेलियात बिग बॅश लिग स्पर्धेचे आयोजन होईल. २०२१ मध्ये आयपीएल आणि त्यानंतर भारतात आयोजित टी-२० विश्वचषक पाहता, आयसीसी यंदाचा टी-२० विश्वचषक २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याच्या विचारात आहे.

टी-२० विश्वचषक रद्द करावा का याबाबत आयसीसीत अंतर्गत चर्चा सुरु झाली आहे. आयसीसीचे भव्यिातील स्पर्धा (एफटीपी) वेळापत्रक, इतर देशांचे दौरे, ब्रॉडकास्टर्स या सर्वांना विचार केला असता २०२२ हे वर्ष टी-२० विश्वचषकासाठी योग्य असल्याचे अनेकांचे मत असल्याची माहिती आहे. मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

जपाननेही यंदाच्या आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकलले आहे. अनेक महत्वाच्या देशात अद्यापही करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही स्पर्धा खेळवणे योग्य नसल्याचे मत अनेक क्रीडापटूंनी व्यक्त केले होते. त्यामुळे टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल आयसीसी आता काय निर्णय घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (वृत्तसंस्था)

आयपीएलसाठी आशिया चषकावर परिणाम?

च्बीसीसीआयने इंडियन प्रिमीयर लीगचे आयोजन १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलले. तथापि १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल का याबद्दलही साशंकता आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन करता येईल का, ही शक्यता तपासून पाहत आहे. यासाठी गरज भासल्यास आशिया चषकाचे आयोजन पुढे ढकलून ही स्पर्धा नंतर घेण्याचा विचार सुरु असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.

च्‘सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळी याबद्दल निर्णय घेऊ. आॅगस्ट-सप्टेंबर महिने आमच्यासाठी पर्याय आहे, असे या सूत्रांनी स्पष्ट केले. आशियाई क्रिकेट परिषदेच्या पुढील बैठकीत बीसीसीआय हा मुद्दा चर्चेला आणणार असल्याचे कळते. आर्थिक लाभाच्या दृष्टीने आयपीएल सर्वात महत्वाची स्पर्धा मानली जाते. ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ३ हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचसोबत संघमालकांनाही १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान होईल.

च्आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या वेळापत्रकानुसार भारत सप्टेंबर महिन्यात आशिया चषकासह इंग्लंडविरुद्ध ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि विंडीजच्या संघांचेही या महिन्यात दौरे आहेत. मात्र आॅस्ट्रेलियन संघ या काळात मोकळा असणार आहे. त्यामुळे आॅगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत इंडियन प्रिमीयर लीगचे १३ वे सत्र खेळवायचे झाल्यास, बीसीसीआयला बरीच धावाधाव करावी लागेल. आयपीएलला २९ मार्चपासून सुरूवात होणार होती.

टॅग्स :टी-२० क्रिकेटआयसीसी