Join us
Daily Top 2Weekly Top 5

धोनीचा बायोपिक पाहिला अन् पाकिस्तानी सेल्समन नोकरी सोडून झाला क्रिकेटर, कोण आहे तो?

Pakistan Cricket: एकेकाळी सेल्समन म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट पाहिला. धोनीचा रेल्वे टीसी ते वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हा प्रवास पाहून तो इतका प्रेरित झाला की, त्याने स्वतःची नोकरी सोडून हातात बॉल घेतला. आज तो पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:09 IST

Open in App

Who is Usman Tariq: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा त्यांच्या अनोख्या शैलीची चर्चा जास्त होते. सध्या पाकिस्तानचा रहस्यमयी फिरकी गोलंदाज उस्मान तारिक त्याच्या विचित्र गोलंदाजी ॲक्शनमुळे जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, सेल्समन म्हणून काम करणाऱ्या तारिकने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक पाहून क्रिकेटर होण्याचे ठरवले आणि नोकरी सोडली, आज तो पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या बायोपिकमुळे उस्मान तारिकच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ज्याप्रमाणे धोनीने रेल्वेतील तिकीट कलेक्टरची नोकरी सोडून क्रिकेटमध्ये इतिहास घडवला, त्याचप्रमाणे तारिकनेही सेल्समनची नोकरी सोडली आणि क्रिकेटमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत तो पाकिस्तानच्या संघाकडून खेळत आहे. धोनी हा त्याचा प्रेरणास्थान असल्याचे त्याने अनेकदा बोलून दाखवले आहे. 

उस्मान तारिक हा पाकिस्तानचा एक महत्वाचा गोलंदाज आहे. शिवाय, त्याची बॉलिंग अ‍ॅक्शन थोडी वेगळी असल्यामुळे मोठमोठे फलंदाज त्याच्या जाळ्यात अडकत आहेत. परंतु, त्याची गोलंदाजी अनधिकृत असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे आयसीसीने त्याची अ‍ॅक्शन पुन्हा एकदा तपासली जाईल असे म्हटले आहे.  उस्मान तारिक हा पाकिस्तानचा हुकुमी एक्का मानला जात आहे. उस्मान तारिकने आतापर्यंत चार आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने एकूण ११ विकेट्स घेतल्या आहेत. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६पाकिस्तानऑफ द फिल्ड