Join us  

INDWvsNZW, Live Updates : भारतीय महिला संघाचा पराभव, हरमनप्रीत कौरची ७१ धावांची झुंज व्यर्थ; पुढील प्रवास खडतर

ICC Women's World Cup , India Women's vs New Zealand Women's : भारतीय महिला संघाना आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत आज पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 1:35 PM

Open in App

ICC Women's World Cup , India Women's vs New Zealand Women's : भारतीय महिला संघाना आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत आज पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानवर पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवणाऱ्या मिताली राजच्या ( Mithali Raj ) नेतृत्वाखालील भारतीय संघाचा आज यजमान न्यूझीलंडने पराभव केला. फलंदाजीचासाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतरही धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय महागात पडला. न्यूझीलंडच्या २६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला १९८ धावाच करता आल्या. 

पूजा वस्त्राकरने तिसऱ्याच षटकात अप्रतिम फिल्डिंग करताना किवींची सलामीवीर सुझी बॅट्सला धावबाद केले. कर्णधार सोफी डेव्हिन आणि अॅमेलिया केर यांनी किवींचा डाव सावरला. वस्त्राकरने ही भागीदारी तोडताना डेव्हिनला ३५ धावांवर माघारी पाठवले. पण, त्यानंतर केर व अॅमी सॅटरवेट यांनी वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली. केर ६४ चेंडूंत ५० धावांवर बाद झाली. ८४ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ७५ धावा करणाऱ्या सॅटरवेटची विकेट वस्त्राकरने घेतली. मॅडी ग्रीन ( २७) व कॅटी मार्टीन ( ४१) यांनी अखेरच्या षटकांत चांगला खेळ करताना संघाला ९ बाद २६० धावांपर्यंत मजल मारून दिली. वस्त्राकरने १० षटकांत ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाडने दोन, तर झुलन गोस्वामी व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. 

शेफाली वर्माच्या जागी आज यास्तिका भाटीयाला संधी मिळाली. तिने चांगला खेळ केला, परंतु समोरून त्यांना चांगली साथ मिळाली नाही. मागच्या लढतीत अर्धशतक झळकावणारी स्मृती मानधना ( ६) व दीप्ती शर्मा ( ५) आज अपयशी ठरल्या. भाटीया २८ धावांवर बाद झाल्यानंतर मिताली राज व हरमनप्रीत कौर यांनी संघाचा डाव सावरला होता. पण, भारतीय महिलांनी धावाचा वेग सुरुवातीपासून एवढा संथ ठेवला होता की मिताली व हरमनप्रीत यांच्यावर दडपण वाढत गेले. अॅमीली केरने सलग दोन धक्के देताना भारताचा पराभव पक्का केला. मिताली ३१ व रिचा घोष शून्य धावांवर बाद झाली. स्नेह राणा ( १८) व पूजा वस्त्राकर ( ६) या मागील सामन्यांतील स्टार आज अपयशी ठरल्या.

हरमनप्रीत ६३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७१ धावांवर माघारी परतली आणि भारताचा पराभव निश्चित झाला. भारताचा संघ १९८ धावांवर तंबूत परतला, न्यूझीलंडने ६२ धावांनी हा सामना जिंकला. 

टॅग्स :आयसीसीभारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App