Join us  

INDIAvsIRELAND T-20 LIVE : भारताचा आयर्लंडवर 143 धावांनी विजय

भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात आयर्लंडवर 143 धावांनी सहज मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 8:53 PM

Open in App
ठळक मुद्देभारताचा हा ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय आहे.

- भारताचा आयर्लंडवर 143 धावांनी विजय

भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात आयर्लंडवर 143 धावांनी सहज मात केली. लोकेश राहुल आणि सुरेश रैना यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 213 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ अवघ्या 70 धावांत तंबूत परतला. भारताकडून फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. भारताचा हा ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय आहे.

 

- आयर्लंडला नववा धक्का; स्टुअर्ट थॉमसन बाद

 

- आयर्लंडला आठवा धक्का; जॉर्ज डॉकरेल बाद

 

- कुलदीप यादवने घेतली गॅरी विल्सनची विकेट, आयर्लंडचा सातवा फलंदाज माघारी

- युझवेंद्र चहलने दिला आयर्लंडला सहावा धक्का 

- केव्हिन ओब्रायन बाद; आयर्लंडला पाचवा धक्का

 

- आयर्लंडला चौथा धक्का; युजवेंद्र चहलने मिळवला बळी

 

- आयर्लंडला तिसरा धक्का, जेम्स शेनॉन- उमेशने काढली आयर्लंडची दुसरी विकेट,  विल्यम पोर्टरफिल्ड 14 धावांवर बाद- आयर्लंडला पहिला धक्का, पॉल स्टर्लिंग शुन्यावर बाद 

आयर्लंडविरुद्ध भारताचा 213 धावांचा डोंगर

लोकेश राहुल आणि सुरेश रैना यांचे अर्धशतक व हार्दिंक पंड्याच्या तडफदार खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 213 धावा फटकावल्या. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताने दमदार फलंदाजी केली. राहुलने 36 चेंडूंत 3 चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 70 धावा केल्या. राहुल बाद झाल्यावर रैनाने भारताचा डाव सावरला. रैनाने 45 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 69 धावांची खेळी साकारली. पंड्याने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. पंड्याने फक्त 9 चेंडूंत 1 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

- हार्दिक पंड्याच्या झंझावात; भारताच्या 20 षटकांत 213

हार्दिक पंड्याच्या षटकारासह भारताच्या दोनशे धावा पूर्ण

- हार्दिक पंड्याचे सलग दोन षटकार

- भारताला चौथा धक्का; सुरेश रैना बाद

- भारत 17 षटकांत 3 बाद 167

- दमदार चौकारासह सुरेश रैनाचे अर्धशतक

 

- रोहित शर्मा शून्यावर बाद; भारताला तिसरा धक्का

 

-  भारताला दुसरा धक्का; लोकेश राहुल बाद

 

- बाराव्या षटकात भारत 1 बाद 128

- षटकारासह लोकेश राहुलचे अर्धशतक पूर्ण

 

- दहाव्या षटकात भारताचे शतक पूर्ण

- आठव्या षटकात लोकेश रागुलने फटकावले दोन षटकार

- पाचव्या षटकात भारताचे अर्धशतक पूर्ण

-  विराट कोहली 9 धावांवर बाद

 

आयर्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले

 

 

आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या विजयासाठी भारत सज्ज

ड्युब्लिन : पहिल्या ट्वेन्टी-20 लढतीत भारताने दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे आता आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या विजयासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात चार बदल झाले आहेत. भारतीय संघात दिनेश कार्तिक, उमेश यादव, लोकेश राहुल आणि सिद्धार्थ कौल यांना संधी देण्यात आली आहे.

 

दोन्ही संघ

 

 

टॅग्स :टी-२० क्रिकेटक्रिकेटभारतआयर्लंड