Join us  

भारताचे ‘ये रे माझ्या मागल्या’, दक्षिण आफ्रिकेने १८७ धावांत गुंडाळले

भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (५०) आणि कर्णधार विराट कोहली (५४) यांच्या अर्धशतकानंतरही भारतीय संघाचा तिस-या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला डाव अवघ्या १८७ धावांत संपुष्टात आला. पुन्हा एकदा आघाडीची फळी कोसळल्यानंतर पुजारा-कोहली यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे दोघेही बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोसळला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:33 AM

Open in App

जोहान्सबर्ग : भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (५०) आणि कर्णधार विराट कोहली (५४) यांच्या अर्धशतकानंतरही भारतीय संघाचा तिस-या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला डाव अवघ्या १८७ धावांत संपुष्टात आला. पुन्हा एकदा आघाडीची फळी कोसळल्यानंतर पुजारा-कोहली यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे दोघेही बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोसळला. कागिसो रबाडा याने ३ बळी घेतले. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवसअखेर ६ षटकांत १ बाद ६ धावा असे रोखत भारतीयांनी काही प्रमाणात पुनरागमन केले.वाँडरर्स स्टेडियमवर नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या वेळी, भारतीय फलंदाज गेल्या दोन सामन्यांतील चुका सुधारून मोठी धावसंख्या उभारतील अशी अपेक्षा होती. मात्र, पुजारा - कोहली यांचा अपवाद वगळता पुन्हा एकदा प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्याने भारतीय फलंदाजीमध्ये काहीही फरक पडल्याचे जाणवले नाही.संघनिवडीवरून टीकेचा लक्ष्य ठरलेल्या कर्णधार कोहलीने तिसºया कसोटीमध्ये अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माला बाहेर बसवून उपकर्णधार अजिंक्य रहाणेला संघात स्थान दिले. मात्र, तो केवळ ९ धावा काढून मॉर्नी मॉर्केलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. यामुळे रहाणेच्या निराशाजनक कामगिरीचे सातत्य कायम राहिले. त्याआधी मुरली विजय (८) आणि लोकेश राहुल (०) ही सलामीवीर जोडीही स्वस्तात परतल्याने भारताची २ बाद १३ अशी केविलवाणी सुरुवात झाली होती.या वेळी सर्व आशा पुजारा - कोहली यांच्यावर होत्या. या दोघांनी अपेक्षित खेळी करताना ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याआधीच्या कसोटीमध्ये दोन्ही डावांत धावबाद झालेल्या पुजाराने या वेळी कोणताही धोका न पत्करताना भक्कम बचाव करताना कसोटीमध्ये फलंदाजी कशी करावी, याचे धडेच आपल्या सहकाºयांना दिले.हे दोघेही भारताला सुस्थितीत नेणार, असे दिसत असतानाचा युवा लुंगी एनगिडी याने कोहलीचा बहुमूल्यबळी मिळवत भारताला मोठा धक्का दिला. कोहलीने १०६ चेंडूत ९ चौकारांसह ५४ धावा केल्या. नंतर रहाणेही फारशी चमक न दाखवता परतल्यानंतर भरवशाचा पुजारा नवोदित अँडिल फेहलुकवायो याच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १७९ चेंडूत ८ चौकारांसह ५० धावांची संयमी खेळी केली.पुजारा बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजीला एक प्रकारे गळतीच लागली. ठराविक अंतराने आफ्रिकेने बळी मिळवत भारताचा डाव १८७ धावांवर गुंडाळला. पार्थिव पटेल (२), हार्दिक पंड्या (०), मोहम्मद शमी (८), इशांत शर्मा (०) असे सर्वच अपयशी ठरले. भुवनेश्वर कुमारने ४९ चेंडंूत ४ चौकारांसह ३० धावा करत भारताचा डाव लांबवला. कागिसो रबाडाने ३९ धावांत ३ महत्त्वपूर्ण बळी घेत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले. मॉर्नी मॉर्केल, वेर्नोन फिलँडर आणि अँडिले फेहलुकवायो यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.यानंतर भुवनेश्वरने अचूक मारा करताना दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका देताना एडेन मार्करम याला स्वस्तात बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा डीन एल्गर (४*) आणि कागिसो रबाडा (०*) खेळपट्टीवर होते.धावफलक :भारत : मुरली विजय गो. डीकॉक गो. रबाडा ८, लोकेश राहुल झे. डीकॉक गो. फिलँडर ०, चेतेश्वर पुजारा झे. डीकॉक गो. फेहलुकवायो ५०, विराट कोहली झे. डीव्हिलियर्स गो. एनगिडी ५४, अजिंक्य रहाणे पायचीत गो. मॉर्केल ९, पार्थिव पटेल झे. डीकॉक गो. मॉर्केल २, हार्दिक पंड्या झे. डीकॉक गो. फेहलुकवायो ०, भुवनेश्वर कुमार झे. फेहलुकवायो गो. रबाडा ३०, मोहम्मद शमी झे. रबाडा गो. फिलँडर ८, इशांत शर्मा झे. डुप्लेसिस गो. रबाडा ०, जसप्रीत बुमराह नाबाद ०. अवांतर - २६. एकूण : ७६.४ षटकात सर्व बाद १८७ धावा.गोलंदाजी : मॉर्नी मॉर्केल १५-५-४७-२; वेर्नोन फिलँडर १९-१०-३१-२; कागिसो रबाडा १८.४-६-३९-३; लुंगी एनगिडी १५-७-२७-१; अँडिले फेहलुकवायो ७-१-२५-२.दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर खेळत आहे ४, एडेन मार्करम झे. पार्थिव गो. भुवनेश्वर २, कागिसो रबाडा खेळत आहे ०. अवांतर - ०. एकूण : ६ षटकांत १ बाद ६ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ३-२-३-१; जसप्रीत बुमराह ३-२-३-०.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८द. आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघक्रिकेट