India Vs West Indies Full Schedule: भारताच्या विंडीज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर!

Ind Vs WI Schedule: वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना झाला. या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 05:37 PM2019-07-30T17:37:37+5:302019-07-30T17:38:50+5:30

whatsapp join usJoin us
India’s Tour to West Indies: Full Schedule, Squads, Timings in IST | India Vs West Indies Full Schedule: भारताच्या विंडीज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर!

India Vs West Indies Full Schedule: भारताच्या विंडीज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना झाला. या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 3 ऑगस्टपासून ट्वेंटी-20 मालिकेनं या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं तीन वेगवेगळे संघ जाहीर केले, तर वेस्ट इंडिजनं वन डे व ट्वेंटी-20 चा संघ जाहीर केला आहे. विंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल वन डे मालिकेनंतर निवृत्ती घेणार आहे. भारताच्या वन डे आणि ट्वेंटी-20 संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.  


जाणून घेऊया या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

  • ट्वेंटी-20 मालिका

3 ऑगस्ट, पहिला सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
 4 ऑगस्ट, दुसरा सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
6 ऑगस्ट, तिसरा सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, रात्री 8 वा. पासून

  • वन डे मालिका

8 ऑगस्ट, पहिला सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, सायंकाळी 7 वा. पासून
11 ऑगस्ट, दुसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून
14 ऑगस्ट, तिसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून

  • कसोटी मालिका

22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून

  • दोन्ही संघ

टी-20साठी भारतीय संघ  -  विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा,  वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार,  खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी 

वन डेसाठी भारतीय संघ  - विराट कोहली ( कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी 

कसोटीसाठी भारतीय संघ  -  विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव 

ट्वेंटी-20 साठी वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, किरॉन पोलार्ड, पोव्हमॅन पॉव्हेल, कार्लोस ब्रॅथवेट ( कर्णधार), किमो पॉल, सुनील नरीन, शेल्डन कोट्रेल, ओशाने थॉमस, अँथोनी ब्रॅम्बले, आंद्रे रसेल, खॅरी पिएरे.

वन डेसाठी वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर ( कर्णधार) केमार रोच.
 

Web Title: India’s Tour to West Indies: Full Schedule, Squads, Timings in IST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.