Join us  

India’s Test squad for England Tour : चेतेश्वर पुजाराचे कसोटी संघात पुनरागमन; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज 

India’s Test squad for England Tour : आफ्रिका व आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. १ ते ५ जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड पाचवी कसोटी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 5:57 PM

Open in App

India’s Test squad for England Tour :  इंडियन प्रमिअर लीग २०२२ नंतर भारतीय संघ घरच्या मैदानावरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका आटोपून आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आफ्रिका व आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. १ ते ५ जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड पाचवी कसोटी होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे इंग्लंड दौऱ्यावरील पाचवी कसोटी स्थगित करण्यात आली होती आणि ती कसोटी यंदा होणार आहे. भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाला इतिहास घडवण्याची संधी आहे.

हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन; रोहित, विराट, बुमराह यांना विश्रांती; BCCI ची घोषणा

रोहित शर्मा, विराट कोहली यांना बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली आहे. त्यामुळे ते इंग्लंड दौऱ्यावर दमदार कामगिरी करण्यासाठी ताजे तवाने असणार आहेत. अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) दुखापतीमुळे  दोन महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. त्यामुळे त्याची निवड या कसोटीसाठी झालेली नाही. चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara) मात्र या कसोटीतून भारतीय संघात पुनरागमन केले आहे. कौंटी क्रिकेटमध्ये पुजाराने  ४ सामन्यांत दोन द्विशतकं व दोन शतकांसह १४३.४०च्या सरासरीने ७१७ धावा चोपल्या आणि त्यामुळे त्याची संघात निवड झाली

भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा ( TEST Squad - Rohit Sharma (Capt), KL Rahul (VC), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Hanuma Vihari, Cheteshwar Pujara, Rishabh Pant (wk), KS Bharat (wk), R Jadeja, R Ashwin, Shardul Thakur, Mohd Shami, Jasprit Bumrah, Mohd Siraj, Umesh Yadav, Prasidh Krishna ) 

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून  भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै  पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाचेतेश्वर पुजारा
Open in App