Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिषभ पंतसाठी भारताच्या संघाचे दरवाजे बंद; कर्णधार कोहली म्हणाला...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंत जायबंदी झाला, त्यानंतर तो भारतीय संघाला दिसला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 17:49 IST

Open in App
ठळक मुद्देकोहलीनेच याबाबतचे एक वक्तव्य केले आहे.

मुंबई : बऱ्याच संधी देऊनही भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सातत्याने नापास होत राहीला. त्याला संघात स्थान देत असल्यामुळे कर्णधार विराट कोहलीवरही टीका होत होती. पण आता तर पंतसाठी संघाचे दरवाजे बंद झाल्याचे समजत आहे. कारण कोहलीनेच याबाबतचे एक वक्तव्य केले आहे.

न्यूझीलंडच्या दौऱ्यापूर्वी भारताचे तीन खेळाडू जायबंदी झाले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंत जायबंदी झाला, त्यानंतर तो भारतीय संघाला दिसला नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आणि तिसऱ्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. पण आता तर भारताचा स्टार गोलंदाज जायबंदी झाल्याचे म्हटले जात आहे.

पंत जायबंदी झाल्यानंतर संघात यष्टीरक्षकाला स्थान देण्यात आले नाही. पंतच्या जागी लोकेश राहुलने त्यानंतर भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. राहुलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला यष्टीचीत केले आणि त्यानंतर पंतचा पत्ता कट झाल्याचे म्हटले जाऊ लागले.

कोहली याबाबत म्हणाला की, " यापूर्वी भारतीय संघात राहुल द्रविड यांनी अशीच यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. जर राहुल यष्टीरक्षण करत असेल तर संघात अतिरीक्त फलंदाज खेळवता येऊ शकतो. त्यामुळे संघाचा समतोलही चांगला राहतो. त्यामुळे हा पर्याय आमच्यासाठी चांगलाच आहे." 

टॅग्स :रिषभ पंतविराट कोहलीलोकेश राहुल