-रोहित नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष ज्याकडे लागले होते, त्या भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये भारताने राेमहर्षक विजय मिळून टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
आता न्यूझीलंडविरोधात रविवारी फायनल होणार असून, भारताचा विश्वविजय एका पावलावर आहे. वानखेडेवर झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. मात्र भारतीय फलंदाजांनी इंग्लंडला याचा पश्चाताप करायला भाग पाडले. सेमीमध्ये भारताने जेव्हा जेव्हा इंग्लंडला नमवले तेव्हा तेव्हा भारताने फायनलही जिंकली आहे. हा योगायोग रविवारीही जुळून यावा, ही चाहत्यांची अपेक्षा आहे.
फायनलमध्ये दिसेल टस्सल
भारताचा आणि न्यूझीलंडचा संघही फॉर्मात आहे. सेमीफायनलमध्ये दोन्ही संघांनी दमदार कामगिरी केली आहे. दोन्ही बाजूची फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजही त्याच तोडीचे आहेत. त्यामुळे हा फायनल अत्यंत रोमांचक होईल.
फायनलचे काय चित्र?
आता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल.
आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये भारताने न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवले आहे.
एकूण ३० सामन्यांपैकी भारताने १७ सामने भारताने जिंकले आहेत. ३ अनिर्णित राहिले आहेत.
टी-२० विश्वचषकात भारताची न्यूझीलंडविरोधात फारशी चांगली कामगिरी राहिलेली नाही.
टी-२० विश्वचषकातील ५ सामन्यांपैकी एकच सामना भारताला न्यूझीलंडविरोधात जिंकता आला.
सेमी फायनलचे हीरो कोण ठरले ?
संजू सॅमसन ८९ धावा
इशान किशन ३९ धावा
शिवम दुबे ४३ धावा
हार्दिक पांड्या २७ धावा
तिलक वर्मा २१ धावा
अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे यांनी शेवटच्या चार षटकांमध्ये सामना पूर्णपणे भारताकडे वळविला.