Join us

भारताच्या स्मृती मंधानाची इंग्लंडमध्ये फटकेबाजी सुरूच

भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधानाने महिला क्रिकेट सुपर लीग टी-20 स्पर्धेत पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 12:15 IST

Open in App

अॅरूंडेल - भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधानाने महिला क्रिकेट सुपर लीग टी-20 स्पर्धेत पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केली. तिने 27 चेंडूंत नाबाद 43 धावा करताना वेस्टर्न स्टॉर्म क्लबला साउथर्न वायपर्स क्लबवर नऊ विकेट राखून विजय मिळवून दिला. 

वायपरने 18.1 षटकांत ठेवलेले 91 धावांचे लक्ष्य वेस्टर्न स्टॉर्मने 9.3 षटकांत पार केले. मंधानाने या लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना चार सामन्यांत अनुक्रमे 48, 37, विक्रमी नाबाद 52 आणि नाबाद 43 धावा केल्या आहेत. याआधीच्या सामन्यात तिने 18 चेंडूंत 50 धावांचा विक्रम नोंदवला होता. या लीगमधील ते जलद अर्धशतक ठरले होते. . त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला टी-20 लीगमध्ये न्यूझीलंडच्या सोफी डेव्हीन हीच्या नावावर असलेल्या विक्रमाशीही तिने बरोबरी केली आहे.  

टॅग्स :क्रिकेटक्रीडा