Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताने करावे पराभवाचे आत्मपरीक्षण; मोक्याच्या क्षणी इंग्लंडने बाजी फिरविली

साऊथम्पटनच्या चौथ्या कसोटीत भारताने मालिका बरोबरीसाठी संघर्ष केला. पण मोक्याच्या क्षणी इंग्लंडने बाजी फिरविली. चार दिवसांत ६० धावांनी मिळालेल्या विजयाच्या बळावर यजमानांनी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी मिळविली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 23:22 IST

Open in App

- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितातसाऊथम्पटनच्या चौथ्या कसोटीत भारताने मालिका बरोबरीसाठी संघर्ष केला. पण मोक्याच्या क्षणी इंग्लंडने बाजी फिरविली. चार दिवसांत ६० धावांनी मिळालेल्या विजयाच्या बळावर यजमानांनी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी मिळविली आहे. सर्व काही चांगले घडत असताना परदेशात वर्षभरात दुसरी मालिका गमविल्यामुळे घोर निराशा झाली आहे.चौथ्या कसोटीत सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावांत इंग्लंडला अक्षरश: घाम फोडला होता. पण मधली आणि तळाची फळी मदतीला धावून आली. पहिल्या दिवशी सकाळी ६ बाद ८६ वरून २४६ पर्यंत तसेच तिसऱ्या दिवशी दुपारी ४ बाद ९२ वरून २७१ पर्यंत धावसंख्येला आकार देण्यात तळाच्या फलंदाजांचा मोठा वाटा राहिला. हे पहिल्यांदा घडले नव्हते.सॅम करन याने तर बर्मिंघम आणि लॉर्डस्वरही संयमी खेळी करीत भारताला जेरीस आणले. तळाच्या फलंदाजांना बाद करण्यात आलेल्या अपयशावर भारतीय थिंक टँकने विचार करायला हवा. पहिल्या डावात फलंदाजीला अनुकूल स्थिती असताना यजमान इंग्लंडला गुंडाळल्याने भारतीय संघाला आनंद झाला असावा. यानंतर चेतेश्वर पुजाराच्या शानदार शतकाच्या मदतीने आघाडी मिळविल्यानंतर इंग्लंडला पुन्हा कोंडीत पकडण्याची चांगली संधी आली होती. पण तरीही इंग्लंडने भारताला विजयासाठी २४५धावांचे आव्हान दिलेच.यावेळी मोईन अली भारतासाठी कर्दनकाळ ठरला. पहिल्या तिन्ही कसोटीस मुकणाºया या आॅफ स्पिनरने सामन्यात नऊ गडी बाद केले. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौºयात फारसा प्रभावी मारा केला नसल्याने मोईनला बाहेर ठेवण्यात आले असावे, पण पुनरागमनात चक्क सामनावीराचा पुरस्कार जिंकणाºया मोईनच्या माºयाला फलंदाज का बळी पडले, याचे आत्मपरीक्षण भारताने करावे.द.आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने गमविल्यानंतर विराट अ‍ॅन्ड कंपनी खेळाचे तंत्र सुधारण्याचाही विचार करायला हवा. सध्याच्या मालिकेत गोलंदाजीत भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे पण प्रतिकूल परिस्थितीत फलंदाज संयमी खेळ कसा करू शकतील याचा विचार व्हायला हवा.विराट याला अपवाद म्हणावा लागेल. त्याने साऊदम्पटन कसोटीत चौथ्या डावात रहाणेसोबत शतकी भागीदारी करीत विजयाची आशा पल्लवित केली होती. पण त्याला सहकाºयांची सातत्यपूर्ण साथ हवी आहे. पण ती मिळताना दिसत नाही.

टॅग्स :क्रिकेटभारत विरुद्ध इंग्लंड