Join us  

आजपासून सुरू झालाय 19 वर्षांखालील वर्ल्ड कपचा महासंग्राम, जाणून घ्या टीम इंडियाचे वेळापत्रक

यजमान आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्या सामन्यानं स्पर्धेचा शुभारंभ झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 2:41 PM

Open in App

आजपासून दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली. यजमान आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्या सामन्यानं स्पर्धेचा शुभारंभ झाला. 9 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक आज आपण जाणून घेऊया..

भारतीय संघाने चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018मध्ये वर्ल्ड कप विजयाचा मान टीम इंडियानं पटकावला आहे. यावेळीही टीम इंडियाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 2018मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली आणि दी वॉल राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं जेतेपद पटकावले होते. यंदा प्रियाम गर्गच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. पण, भारतासाठी जेतेपद कायम राखणं इतकं सोपं नसेल.

जाणून घेऊया संपूर्ण वेळापत्रक...अ गट  - भारत, जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंकाब गट - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नायजेरिया आणि वेस्ट इंडिजक गट - बांगलादेश, पाकिस्तान, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वेड गट - अफगाणिस्तान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती

भारताचे सामने19 जानेवारी - वि. श्रीलंका21 जानेवारी - वि. जपान 24 जानेवारी - वि. न्यूझीलंड

भारतीय संघ - प्रियम गर्ग ( कर्णधार),  ध्रुवचंद जुरेल ( उपकर्णधार-यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत,  शुभंग  हेगडे, रवी विश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशग्रा ( यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील, सिद्धेश वीर. 

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघ