Join us  

BREAKING: ऐतिहासिक लढतीसाठी टीम इंडियाचे अंतिम ११ शिलेदार जाहीर; जाणून घ्या कोण In कोण OUT?

WTC Final India's Playing XI : भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ( ICC World Test Championship ) अंतिम ११ सदस्यीय संघांची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 7:35 PM

Open in App

WTC Final India's Playing XI : भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ( ICC World Test Championship ) अंतिम ११ सदस्यीय संघांची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखालील संघात रोहित शर्मा, शुबमन गिल यांना संधी देण्यात आली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला स्थान देण्यात आलं असून वृद्धीमान साहा याला डगआऊटमध्येच बसावं लागणार आहे. 

भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर फिरकी गोलंदाजीचं नेतृत्व रविचंद्रन अश्विन करणार असून अष्टपैलू रवींद्र जडेजाला त्याला साथ देणार आहे. 

असा आहे भारतीय संघ-

  • रोहित शर्मा
  • शुबमन गिल
  • चेतेश्वर पुजारा
  • विराट कोहली (कर्णधार)
  • अजिंक्य रहाणे (उपकर्णधार)
  • रिषभ पंत (यष्टीरक्षक)
  • रविचंद्रन अश्विन
  • रवींद्र जडेजा
  • जसप्रीत बुमराह
  • इशांत शर्मा
  • मोहम्मद शमी

 

न्यूझीलंडच्या ताफ्यात एकच फिरकीपटूअजाझ पटेल ( Ajaz Patel) हा एकमेव फिरकीपटू न्यूझीलंडच्या संघात दिसणार आहे, तर अष्टपैलू कॉलीन डी ग्रँडहोम आणि फलंदाज विल यंग यांच्यासह टॉम ब्लंडल याला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहे. डॉग ब्रेसवेल, जेकब डफ्फी, डॅरील मिचेल, रचीन रवींद्र आणि मिचेल सँटनर या पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ही पाचही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील संघाचे सदस्य होते. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी या खेळाडूंचे आभार मानले. डेव्हॉन कॉनवेय यानं इंग्लंडविरुद्ध द्विशतकासह सर्वाधिक 306 धावा चोपल्या आहेत. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंडइंग्लंडविराट कोहली