Join us  

आगामी विश्वचषकात भारताचा 'हा' खेळाडू फॉर्मात असेल; माजी कर्णधाराने केली भविष्यवाणी

विश्वचषकात नेमका कोणता भारताचा खेळाडू फॉर्मात असेल, अशी भविष्यवाणी एका माजी कर्णधाराने केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 7:29 PM

Open in App
ठळक मुद्देत्यामुळेच संघात महेंद्रसिंग धोनीबरोबर रिषभ पंतलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये पुढेल वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी भारताने आपल्या संघात प्रयोग करायला सुरुवात केली आहे. काही युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांच्या कामगिरीवर नजर ठेवली जात आहे. दुसरीकडे अनुभवी खेळाडूंची कामगिरी चांगली होत नसेल तर त्यांच्याऐवजी पर्यायही दाखवले जात आहेत. पण या विश्वचषकात नेमका कोणता भारताचा खेळाडू फॉर्मात असेल, अशी भविष्यवाणी एका माजी कर्णधाराने केली आहे.

भारतीय संघात सध्या बरेच प्रयोग सुरु आहेत. प्रत्येक खेळाडूसाठी योग्य तो पर्याय शोधला जात आहे. त्यामुळेच संघात महेंद्रसिंग धोनीबरोबर रिषभ पंतलाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता धोनीलाही पर्याय उपलब्ध झाला असून तो विश्वचषकात खेळणार नाही, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण दुसरीकडे धोनीकडे असलेला अनुभव अन्य कोणत्याच संघातील खेळाडूकडे नाही. त्यामुळे त्याला विश्वचषकासाठी संघात ठेवायला हवे, असे म्हटले जात आहे.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने याबाबत म्हटले आहे की, " आगामी विश्वचषकात धोनीला संघात स्थान द्यायला हवे, असे म्हटले आहे. कारण या विश्वचषकात जुना धोनी पुन्हा दिसेल आणि तोच भारताचा सर्वात फॉर्मात असलेला क्रिकेटपटू असेल."

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीसौरभ गांगुली