Join us  

विजयी लय कायम राखण्याचा भारताचा निर्धार

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरी वन डे आज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 2:15 AM

Open in App

लखनौ : मागच्या सामन्यात विजयासह बरोबरी साधणारा भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजयी लय कायम ठेवून पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत पकड मिळविण्याच्या निर्धाराने खेळणार आहे.पहिल्या सामन्यात आठ गड्यांनी पराभवानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करीत नऊ गडी राखून विजय संपादन केला होता. मिताली राज हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यास इच्छुक आहे. भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेला केवळ १५७ धावात रोखले. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने चार तसेच राजेश्वरी गायकवाडने तीन गडी बाद केले होते. मानसी जोशीनेदेखील दोन गडी बाद केले. 

प्रत्युत्तरात स्मृती मानधना  (८० चेंडूंतील ६४ धावा) आणि पूनम राऊत(८९ चेंडूत ६२) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १३८ धावांची भागीदारी करीत २८.४ षटकात विजय साकार केला होता. भारतासाठी दुसऱ्या सामन्यात झुलनचा फॉर्म तर द. आफ्रिकेसाठी सुने लुस आणि लारा गुडाल यांची फलंदाजी महत्त्वपूर्ण ठरली होती.

प्रतिस्पर्धी संघ :nभारत : मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम राऊत,  प्रिया पूनिया, यस्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर, डी हेमलता, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा, स्वेता वर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी प्रत्यूषा आणि मोनिका पटेल.nदक्षिण आफ्रिका : सुने लुस (कर्णधार), अयाबोंगा खाका, शबनिम इस्माइल, लॉरा वोल्वार्ट, त्रिशा चेट्टी, सिनालो जाफ्ता, तस्मीन ब्रिट्ज, मारिजाने कैप, नोंडुमिसो सांगेज, लिजेल ली, एनेके बॉश, फाये ट्यूनिक्लिफ, नॉनकुलुलेको मलाबा, मिनगोन डु प्रीज, नेदिन डी क्लर्क, लारा गुडाल, टुमी सेखुखुने.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमिताली राज