Join us  

धावांच्या फरकाने भारताचा सर्वात मोठा विजय

भारताने आयर्लंडवर १४३ धावांच्या फरकाने विजय मिळवला. भारताने आतापर्यंत कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाविरोधात टी २० क्रिकेट सामन्यात धावांच्या फरकाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. मात्र या विक्रमाच्या यादीत भारत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 11:32 PM

Open in App
ठळक मुद्देविक्रमाच्या यादीत भारत संयुक्त दुसºया स्थानी

आकाश नेवे : भारताने आयर्लंडवर १४३ धावांच्या फरकाने विजय मिळवला. भारताने आतापर्यंत कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाविरोधात टी २० क्रिकेट सामन्यात धावांच्या फरकाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. मात्र या विक्रमाच्या यादीत भारत संयुक्त दुसºया स्थानावर आहे. या यादीत अव्वल स्थानावर आहे श्रीलंकेचा संघ. श्रीलंकेने १४ सप्टेंबर २००७ रोजी केनियावर १७२ धावांनी विजय मिळवला होता. लंकेने या सामन्यात २६१ धावा केल्या होत्या.  तर पाकिस्तानने याच वर्षी १ एप्रिलला विश्वविजेत्या वेस्टइंडिजला १४३ धावांच्या फरकानेच पराभूत केले होते. आतापर्यंत एकुण १३ वेळेस शतकी धावसंख्येच्या फरकाने संघांनी पराभव पत्करले आहेत. मात्र एकदाही भारताचा पराभव  एवढ्या मोठ्या फरकाने झालेला नाही.

भारताने १० वेळा प्रतिस्पर्धी संघावर ५० किंवा त्या पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला आहे. या आधीचा भारताचा विक्रम ९३ धावांच्या फरकाने विजय मिळवण्याचा होता. कटकमध्ये झालेल्या टी २० सामन्यात ९३ धावांनी विजय मिळवला होता. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या या सामन्यातही भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता तो युझवेंद्र चहल. आयर्लंडविरोधात तीन बळी घेणाऱ्या चहलने लंकेविरोधात चार बळी घेतले होते. आणि योगायोग म्हणजे आयर्लंडविरोधात अर्धशतक झळकावणाºया के.एल. राहूल याने लंकेविरोधातही अर्धशतकच झळकावले होते.

टॅग्स :क्रिकेटभारतविराट कोहलीक्रीडा