Join us  

भारतीयांनो, पाकिस्तानचे कांदे आणि टॉमेटो खाता, मग क्रिकेटचा सामना खेळायला नकार का? शोएब अख्तरने तोडले अकलेचे तारे

भारताचा अनधिकृत कबड्डी संघ पाकिस्तानमध्ये विश्वचषक खेळायला आला होता. त्यावर शोएबने कमेंट केली होती. पण भारतामधून अधिकृतपणे कोणतेही खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी गेलेले नाही, असा दावा भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 2:34 PM

Open in App

भारतपाकिस्तानबरोबर व्यापार करते. भारतीयपाकिस्तानमधले कांदे-टॉमेटो खाता, मग आमच्याबरोबर क्रिकेटची मालिका खेळायला तुम्हाला काय समस्या आहे, असा सवाल भारताचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विचारला आहे.

भारताचा अनधिकृत कबड्डी संघ पाकिस्तानमध्ये विश्वचषक खेळायला आला होता. त्यावर शोएबने कमेंट केली होती. पण भारतामधून अधिकृतपणे कोणतेही खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी गेलेले नाही, असा दावा भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी केला होता. त्यानंतर शोएबने या विषयावर एक व्हिडीओ बनवला होता.

याबाबत शोएब म्हणाला की, " जर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कबड्डीचे सामने होऊ शकतात. या दोन देशांमध्ये डेव्हिस चषकाचे सामने होऊ शकतात. व्यापार होऊ शकतो. आम्ही एकमेकांचे कांदे, बटाटे, टॉमेटो खाऊ शकतो. मग भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय क्रिकेट मालिका का होऊ शकत नाही." 

शोएब पुढे म्हणाला की, " जर भारताला पाकिस्तानमध्ये येऊन सामने खेळायचे नसतील तर आम्हीदेखील त्यांच्या देशात जाणार नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये खेळण्यात आलेला आशिया चषक आता दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. जर भारत आणि पाकिस्तान दुबईमध्ये आशिया चषक खेळू शकतात, तर मग त्रयस्थ ठिकाणी क्रिकेटची मालिका खेळत का नाहीत. जर भारताला पाकिस्तानबरोबर क्रिकेटची द्विदेशीय मालिका खेळायची नसेल तर मग कबड्डी आणि टेनिसदेखील खेळू नये. त्याचबरोबर भारतीयांनी पाकिस्तानबरोबर व्यापारही करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे." 

भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा सीरिज खेळवायला हवी, असं का सांगतोय युवराज सिंग...

भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशांमध्ये क्रिकेट मालिका गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये झालेली नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आता मालिका होणे अशक्यच असल्याचे म्हटले जाते. पण या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका खेळवण्यात यायला हवी, अशी इच्छा भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2013नंतर द्विदेशीय मालिका झालेलीच नाही. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) आणि आशिया चषक स्पर्धेत हे संघ एकमेकांना भिडतील. पण यंदा ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली होती. त्यामुळे आता या स्पर्धेचे यजमानपद दुबईला देण्यात येणार आहे.

फेब्रुवारी 2019ला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी झाली होती. पण, हा सामना झाला. बर्मिंगहॅम येथील एडबस्टन स्टेडियमवर कडक सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या या सामन्यात भारतानं डकवर्थ लुइस नियमानुसार 89 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर मात्र दोन्ही देशांमध्ये सामना झालेला नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांवर क्रिकेट विश्वाचे लक्ष असते. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये सामने व्हायला हवेत, अशी इच्छा भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने केली आहे. युवराजने निवृत्ती घेतली असून तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसत आहे.

युवराज याबाबत म्हणाला की, " भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांची साऱ्यांनाच उत्सुकता असते. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये सामने व्हायला हवेत, असे मला वाटते. पण ही माझी इच्छा असली तरी ही मालिका खेळवणे माझ्या हातात नक्कीच नाही. त्यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी चर्चा करायला हवी." 

टॅग्स :शोएब अख्तरभारतपाकिस्तानकबड्डीटेनिसदुबई