Join us

भारतीय महिला संघ जेतेपदासाठी उत्सुक

टी-२० तिरंगी मालिका : आॅस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम लढत आज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 04:40 IST

Open in App

मेलबोर्न : फलंदाजांना सूर गवसल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला संघ बुधवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० तिरंगी मालिकेत जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.पहिल्या तीन सामन्यांत भारतीय संघाला सांघिक कामगिरी करण्यात अपयश आले, पण शनिवारी आॅस्ट्रेलियाचा ७ गड्यांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. उभय संघांनी साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध एक-एक सामना जिंकला आहे. सीनिअर सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना व कर्णधार हरमनप्रीत कौर सातत्याने धावा फटकावत आहेत. भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा व राजेश्वरी गायकवाड सातत्याने चांगली कामगिरी करीत आहेत. इंग्लंडविरुद्ध लीग सामन्यांत कमी धावसंख्या उभारल्यानंतरही भारताने विजय मिळवला होता.दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर इंग्लंडचा पराभव केला. त्यांच्या फलंदाज मॅग लानिंग व एलिस पॅरी यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली.प्रतिस्पर्धी संघभारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, वेदा कृष्णामूर्ती, तानिया भाटिया, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी, राधा यादव, रिचा घोष, अरुंधती रेड्डी, हरलीन, नुजहत, पूनम यादव.आॅस्ट्रेलिया : मेग्लानिन (कर्णधार), एलिसा हिली, बेथ मुनी, एशले गार्डनर, एलिसे पॅरी, रशेल हेन्स, जेस जोनासेन, डेलिसा किमिंसे, अनाबेल सदरलँड, जार्जिया वेयरहॅम, मेगान शट, निकोला कारे, सोफी मोलिनू, एरिन बर्न्स, तायला व्ही.