Join us

तिरंगी मालिका जिंकण्याचे भारतीय महिला संघाचे लक्ष्य

India Vs South Africa : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आगामी टी-२० महिला विश्वचषक स्पर्धेआधी त्रिकोणीय टी-२० मालिका जिंकून आपली तयारी भक्कम करण्याच्या निर्धाराने गुरुवारी अंतिम लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 10:28 IST

Open in App

ईस्ट लंडन : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आगामी टी-२० महिला विश्वचषक स्पर्धेआधी त्रिकोणीय टी-२० मालिका जिंकून आपली तयारी भक्कम करण्याच्या निर्धाराने गुरुवारी अंतिम लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडेल. या मालिकेआधी, भारताला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-४ अशी मालिका गमवावी लागली होती. 

दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचा समावेश असलेल्या त्रिकोणीय मालिकेत भारताने मालिकेत सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला नमवले, तर यानंतरचा दोन्ही संघांदरम्यानचा सामना पावसामुळे रद्द झाला. तसेच, वेस्ट इंडिजला दोन वेळा नमवून भारतीयांनी अंतिम फेरी गाठली. या मालिकेत दीप्ती शर्माने गोलंदाजीत कमालीचे सातत्य दाखवले. गेल्या काही सामन्यांतील निराशाजनक कामगिरीने टीकेला सामोरे गेलेल्या जेमिमा रॉड्रिग्ज हिनेही अखेरच्या साखळी सामन्यात चांगली फलंदाजी केली.

सामन्याची वेळ : सायंकाळी ६.३० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App