ठळक मुद्दे महिला टीमचं मुंबई विमानतळावर शानदार स्वागत कऱण्यात आलं.मुंबई विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली.महिला खेळाडूंना पुष्पगुच्छ आणि फुलांचे हार देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं.
मुंबई, दि. 26- आयसीसी वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद पटकावणारा भारतीय महिला संघ बुधवारी सकाळी मुंबईत दाखल झाला. या महिला खेळाडूंचं मुंबईकरांनी जोरदार स्वागत केलं. बुधवारी सकाळी महिलांची टीम मुंबई विमानतळावर येताच त्याचं शानदार स्वागत झालं. यावेळी मुंबई विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली. महिला खेळाडूंना पुष्पगुच्छ आणि फुलांचे हार देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मुंबई विमानतळाचा परिसर 'इंडिया इंडिया' या घोषणेने दुमदुमून गेला होता. टीममधील खेळाडूंचं कपाळाला टीळा लावून स्वागत करण्यात आलं. तसंच एअरपोर्ट असलेल्या चाहत्यांच्या हातात महिला खेळाडूंना शुभेच्छा देणारे बॅनर्सही पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी महिला क्रिकेट टीममधील आठ खेळाडू मुंबईत परतल्या आहेत. हरमनप्रीत कौर, झुलन गोस्वामी, सुषमा वर्मा, स्मृती मंधाना, शिखा पांड्ये, पुनम राऊत, दीप्ती शर्मा या आठ खेळाडूंचं आज सकाळी स्वागत झालं. टीममधील बाकी खेळाडू बुधवारी दुपारी मुंबईत येतील, अशी माहिती मिळते आहे.
आयसीसी वर्ल्डकपमध्ये महिला टीमने केलेल्या कामगिरीचं सगळीकडूनच कौतुक केलं जातं आहे. या महिला खेळाडूंबद्दल लोकांना किती आदर आहे, हे विंमानतळावर जमलेल्या चाहत्यांच्या गर्दीवरून दिसून आल्याची प्रतिक्रिया तेथिल काही उपस्थितांनी दिली आहे. महिला संघाच्या या कामगिरीबद्दल बीसीसीआयने टीममधील प्रत्येक खेळाडूला 50 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तर सपोर्टिंग स्टाफला 25 लाखांचं बक्षीस बीसीसीआय देणार आहे.
महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचं विश्वचषकाला गवसणी घालण्याचं स्वप्न भंगलं पण या सगळ्या खेळाडूंनी क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली आहेत. मिताली राजच्या भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतावर मात करत इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडला माफक धावसंख्येत रोखल्यावर पूनम राऊत आणि हरमनप्रीत कौर यांच्या झुंजार खेळाच्या जोरावर भारतीय महिला संघाने या आव्हानाचा षटकात फडशा पाडला. समोर माफक आव्हान असलं तरी सलामीची स्मृती मंधाना (0) आणि कर्णधार मिताली राज (17) या झटपट बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला होता. मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या पूनम राऊतने हरमनप्रीत कौरच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत भारताचे आव्हान कायम ठेवलं होतं. मात्र पूनम राऊत (87) आणि वेदा कृष्णमूर्ती (35) या बाद झाल्यानंतर भारताची तळाची फळी कोसळली. सहा बळी टिपणाऱ्या अॅना श्रबशोले हिने सहा बळी टिपत यजमान संघाला लढतीत पुनरागमन करून दिले. अखेर भारतीय महिला संघाला 9 धावांनी पराभव पत्करावा लागला.