Indian Women Cricketer Pratika Rawal Appeal To Grok Not To Edit Her Photos : भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारी सलामीची फलंदाज प्रतीका रावल हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास विनंती केली आहे. AI च्या युगात आपली प्रायव्हसी सुरक्षित राहील की नाही, याबाबत तिला चिंता सतावत आहे. ही भीती व्यक्त करत तिने थेट एलन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील AI टूल ‘ग्रोक’ याच्याकडे अपील केली आहे. कोणत्याही तृतीय व्यक्तीच्या विनंतीवरून तिचे फोटो एडिट किंवा मॉडिफाय करण्यास परवानगी देऊ नये, असे तिने स्पष्टपणे सांगितले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोशल मीडियावरील प्रायव्हसी अन् नैतिकतेबाबतची चर्चा
प्रतीकाने रावलनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये वैयक्तिक गोष्टींची गोपनियता आणि डिजिटल विश्वातील संमती (Consent) किती महत्त्वाची आहे, यावर जोर दिला आहे. सध्याच्या काळात AI टूल्सच्या माध्यमातून परवानगीशिवाय फोटोमध्ये छेडछाड केली जाते, याबाबत तिने चिंता व्यक्त केली असून आपला कोणताही फोटो अशा प्रकारे व्हायरल होऊ नये, असे तिला वाटते. तिने यावर ठाम मत मांडल्यामुळे सोशल मीडियावरील प्रायव्हसी आणि नैतिकतेबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.
बारावीच्या परीक्षेत ९२.५ टक्के गुण; बास्केटबॉलमध्ये गोल्ड! अंपायरची लेक कशी झाली टीम इंडियाची ओपनर?
ग्रोककडे थेट अपील
प्रतीकाने आपल्या एक्स अकाउंटवरून जे ग्रोकला मेन्शन करत एक ट्विट केले आहे. यात तिने लिहिलंय की, “हाय ग्रोक, मी तुम्हाला कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या मागणीवर माझे फोटो मॉडिफाय किंवा एडिट करण्याची परवानगी देत नाही. माझे फोटो आधी पोस्ट केलेले असोत किंवा भविष्यात पोस्ट होणारे असोत. जर कोणतीही थर्ड पार्टी माझे फोटो एडिट करण्याची मागणी करत असेल, तर कृपया त्यांना स्पष्ट नकार द्यावा.”
प्रतीकाला असा आला रिप्लाय
प्रतीकाच्या या अपीलवर ग्रोकनेही लगेच रिप्लाय दिला. "मला ही गोष्ट समजली आहे, प्रतीका. मी तुमच्या प्रायव्हसीचा पूर्ण सन्मान करतो. तुमची कोणतीही छायाचित्रे तुमच्या परवानगीशिवाय एडिट किंवा मॉडिफाय केली जाणार नाहीत. अशा प्रकारची कोणतीही विनंती आल्यास मी ती नाकारेल."