Join us

भारताच्या महिला क्रिकेटपटूला लिपस्टिक लावली आणि ...

सोशल मीडियावर सध्या काहीही सुरु आहे. या गोष्टी कोणत्या थराला जातील, हे सांगता येत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 13:04 IST

Open in App

मुंबई : कर्तुत्वाला कोणताही चेहरा नसतो. गुणववत्तेलाही तो नसतो. पण काही लोकांना कर्तबगारीपेक्षा चेहरा महत्वाचा वाटतो. अशा लोकांना सोशल मीडियावर चांगलीच चपराक मिळाली आहे. सोशल मीडियावर सध्या काहीही सुरु आहे. या गोष्टी कोणत्या थराला जातील, हे सांगता येत नाही.

सोशल मीडियावर भारताच्या एका महिला क्रिकेटपटूला लिपस्टिक लावल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील चाहते चांगलेच खवळलेले आहेत. त्यामुळे आता या गोष्टीवर टीकेची झोड उठताना दिसत आहे.

भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना ही सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, पण तिच्या एका फोटोवरून हे वादळ उठले आहे. स्मृतीचा एक फोटो एका संकेतस्थळाने पोस्ट केला आणि पण त्यामध्ये काही बदल केले. या संकेतस्थळाने फोटो पोस्ट करण्यापूर्वी स्मृतीच्या ओठांना फोटोशॉप वापरून लाल लिपस्टिक लावल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चाहत्यांनी या गोष्टीला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले आहे.

 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघ