Join us  

चेन्नई कसोटी सुरु असतानाच टीम इंडियाच्या खेळाडूनं जाहीर केली निवृत्ती

Naman Ojha Retirement : टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज नमन ओझा (Naman Ojha) याने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 8:23 PM

Open in App

एका बाजूला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत दमदार कामगिरी करत असताना दुसरीकडे भारतीय संघासाठी खेळलेल्या एका महत्वाच्या खेळाडूनं निवृत्तीची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज नमन ओझा (Naman Ojha) याने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३७ वर्षीय नमन ओझानं भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात प्रतिनिधीत्व केलं आहे. (Indian wicketkeeper batsman Naman Ojha announces retirement from all forms of cricket)

नमन ओझा यानं भारतासाठी एक कसोटी, एक एकदिवसीय आणि दोन टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१० साली नमन ओझानं झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. तर २०१५ साली कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. दरम्यान, या सामन्यांमध्ये नमन ओझा काही छाप पाडू शकला नव्हता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा ३५ ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. 

स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळताना नमन ओझानं तब्बल २० वर्ष क्रिकेट खेळलं आहे. रणजी क्रिकेटमध्ये नमन ओझानं दमदार कामगिरी केली आहे. नमन ओझानं १४६ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४१.६७ च्या सरासरीनं तब्बल ९७५३ धावा केल्या आहेत. यात तब्बल २२ शतकं आणि ५५ अर्धशतकांचा समावेश आहे. स्थानिक कसोटीत नमनने २१९ धावांची वैयक्तिक खेळी सुद्धा साकारली होती.  आयपीएलसह एकूण १८२ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये नमन ओझानं २९७२ धावा केल्या आहेत. यात १५ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये नमन दिल्ली डेअरडेव्हील्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांकडून खेळला आहे. 

परदेशी लीगमध्ये खेळणार नमन ओझाआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना नमन ओझानं आणखी एक महत्वाची माहिती दिली. "स्थानिक क्रिकेटमध्ये २० वर्षांच्या करिअरनंतर आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. अनेक दिग्गजांसोबत खेळण्याची मला संधी मिळाली. त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. यानंतर आता विदेशी लीगमध्ये खेळण्याची इच्छा आहे", असं नमन ओझा म्हणाला.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ