Join us

बंदीच्या निर्णयावर पृथ्वी शॉचं उत्तर, म्हणाला...

पृथ्वी शॉनं डोपिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयनं त्याच्यावर कारवाई केली. स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 21:25 IST

Open in App

मुंबई: भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने चुकून बंदी असलेले द्रव्य प्यायले आणि वाडाच्या नियमानुसार तो उत्तेजक द्रव्य सेवनात दोषी आढळला आहे. बीसीसीआयने त्याच्यावर ८ महिन्यांची बंदी घातली आहे आणि ही बंदी १५ नोव्हेंबर २०१९ ला संपुष्टात येईल. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर पृथ्वीने ट्विट करून भावना व्यक्त केल्या. 

पृथ्वी शॉनं डोपिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयनं त्याच्यावर कारवाई केली. सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेदरम्यान पृथ्वीच्या लघवीचा नमुना घेण्यात आला. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी इंदूरमध्ये ही चाचणी घेण्यात आली. यातून पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटलाइन असल्याचं निष्पन्न झालं. टर्ब्युटलाइनचा समावेश वाडानं प्रतिबंधित द्रव्यांमध्ये केला आहे. यानंतर बीसीसीआयनं उत्तेजक द्रव्यविरोधी नियमांतर्गत पृथ्वीवर कारवाई केली. 

पृथ्वी म्हणाला," सय्यद मुश्ताक स्पर्धेदरम्यान मला सर्दी खोकल्याचा त्रास झाला होता. त्यावेळी मी औषध घेतले त्यात बंदी घातलेल्या द्रव्य निष्पन्न झाले. बीसीसीआयच्या नियमाचे मी अप्रत्यक्षिकपणे उल्लंघन केले. मला माझी चूक मान्य आहे. खेळाडूने किती सतर्क राहायला हवं याचा धडा मला शिकायला मिळाला."

याचबरोबर, पृथ्वी शॉसोबतच अक्षय दुल्लारवार (विदर्भ) आणि दिव्या गजराज (राजस्थान) सुद्धा उत्तेजक द्रव्य सेवनात दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अक्षय दुल्लारवारला 9 नोव्हेंबरपर्यंत तर दिव्या गजराजला 25 सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :पृथ्वी शॉ