Sania Mirza-Shoaib Malik: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी मोठी घोषणा केली आहे. दोघेही लवकरच एकत्र दिसणार आहेत. वास्तविक, सानिया आणि शोएब एक टॉक शो आणणार असल्याची घोषणा करण्यात आलीये.
या कार्यक्रमात टेनिस सेन्सेशन सानिया आणि तिचा पती शोएब मलिक एकत्र दिसणार आहेत. त्याने त्याच्या शोचे नावही उघड केलेय. 'मिर्झा मलिक शो' असे या नवीन कार्यक्रमाचे नाव असेल. त्याचे पोस्टरही चांगलेच व्हायरल होत आहे. हा शो पाकिस्तानी वाहिनीवर येणार आहे.
घटस्फोटाच्याचर्चाभारतीय टेनिसस्टार
सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर
शोएब मलिक या दोघांनी काही वर्षापूर्वी लग्न केले. त्यांच्या लग्नादरम्यान अनेकांनी टीकेसह विरोध केला होता. तरीही या दोन खेळाडूंनी लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे. सध्या सोशल मीडियावर हे दांम्पत्य विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या दोघांत सध्या पटत नाही.त् यामुळे ते वेगळे राहणार असल्याचे म्हटले जात आहे.