Join us

भारतीय संघाने दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

भारतीय वेळेनुसार रात्री १२ वाजल्यानंतर भारतीय खेळाडूंनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 00:29 IST

Open in App

पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. पण तिसरा एकदिवसीय सामना सुरु असताना भारतीय वेळेनुसार रात्री १२ वाजल्यानंतर भारतीय खेळाडूंनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, केदार जाधव, रवींद्र जडेजा यांच्यासह अन्य भारतीय खेळाडूंनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा हा व्हिडीओ

टॅग्स :स्वातंत्र्य दिनविराट कोहलीरोहित शर्मारवींद्र जडेजाकेदार जाधवबीसीसीआय