Join us  

पाकिस्तानला धूळ चारायला भारतीय संघ सज्ज; रविवारी संध्याकाळी होणार सामना

भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला 103 धावांनी पराभूत केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 4:19 PM

Open in App

मुंबई : पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबरभारताचा क्रिकेट संघ दोन हात करणार आहे. पाकिस्तानबरोबर भिडण्यासाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे.

भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळावे का, यावर दोन्ही देशांत जोरदार चर्चा सुरु आहे. पण आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रेड बुल कॅम्पस क्रिकेट स्पर्धेच्या वर्ल्ड फायनल्समध्ये होणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेत हे दोन्ही संघ सातवेळा आमने सामने आले आहेत.

या स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला 103 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर भारताने इंग्लंडवर 33 धावांनी विजय मिळवला होता. पण तिसऱ्या सामन्यात मात्र भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 62 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आता भारतीय संघ 'अ' गटामध्ये चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

टॅग्स :भारतपाकिस्तान