Join us

भारतीय संघ वर्चस्व गाजविण्यास सज्ज, पहिली कसोटी आजपासून

आत्मविश्वासाने खेळणारा भारतीय संघ गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशवर वर्चस्व गाजविण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 07:27 IST

Open in App

इंदूर: आत्मविश्वासाने खेळणारा भारतीय संघ गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशवर वर्चस्व गाजविण्याच्या इराद्याने उतरणार आहे. हा सामना लाल चेंडूने खेळला जाणार असला तरी येथे चर्चा मात्र ‘गुलाबी चेंडू’चीच होत आहे. कोलकाता येथे २२ नोव्हेंबरपासून दुसरी कसोटी गुलाबी चेंडूने खेळली जाईल. उभय संघांसाठी दिवस- रात्रीचा हा पहिला सामना ठरेल.जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या कॅलेंडरमधील ही मालिका विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बलाढ्य भारतीय संघ विरुद्ध स्टार खेळाडूंविना खेळणाऱ्या बांगलादेश यांच्यात होत आहे. बांगलादेशला भारत चार दिवसात पराभूत करू शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तमिम इक्बाल आणि शकिब अल हसन यांच्या अनुपस्थितीत बांगलादेशसाठी विजय अशक्यप्राय वाटतो. मर्यादित षटकांच्या सामन्यात झुंझार कामगिरी करणारा हा संघ कसोटीत नेहमीच कमकुवत ठरला.मागच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला हरविणाºया भारताकडे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे. दुसरीकडे बांगलादेशचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि कर्णधार मोमिनुल हक याच्या नावावर दहापेक्षा कमी शतकांची नोंद आहे. मुशफिकूर रहीम आणि महमुदुल्लाह हे अनुभवी खेळाडू असले तरी कसोटीत त्यांचा रेकॉर्ड कमकुवत राहिला. भारतीय कर्णधार कोहलीने कसोटीत २६, अजिंक्य रहाणे ११ आणि चेतेश्वर पुजाराने १८ कसोटी शतके झळकावली आहेत. या तिघांआधी सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांचेही बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे आव्हान असेल. भारतीय गोलंदाजांनी ८०० हून अधिक गडी बाद केले. त्यामुळे या सामन्यात उभय संघांची तुलना होऊ शकत नाही.होळकर स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना पूरक मानली जाते. येथे चेंडू उसळी घेतो, तसेच सीमारेषा लहान आहे. मोहम्मद शमी आणि उमेश यादव हे वेगवान माºयाचे नेतृत्व करणार असून रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन फिरकीची बाजू सांभाळणार आहेत. कुलदीप यादव याच्याऐवजी इशांत शर्मा याला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून स्थान मिळण्याची शक्यता आहे. कोहली मात्र कुलदीपला स्थान देण्याच्या पवित्र्यात आहे. (वृत्तसंस्था)>इंदूरच्या खेळपट्टीवर रंगतदार खेळ - क्यूरेटरभारत- बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीसाठी होळकर स्टेडियमची खेळपट्टीवर रंगतदार खेळ होण्याची माहिती या मैदानाचे मुख्य क्यूरेटर समंदरसिंग चौहान यांनी दिली. या खेळपट्टीत फलंदाज आणि गोलंदाजांसाठी काही विशेष असल्याचे ते म्हणाले.सामन्याच्या पूर्वसंध्येला आकाश ढगाळ होते. सूर्याने अधूनमधून दर्शन दिले. उभय संघांनी याच वातावरणात सराव केला. सामन्यादरम्यान पाऊस पडला तरी आम्ही सज्ज आहोत, पावासाचा व्यत्य टाळण्यासाठी मैदानावर सर्व सोयी उपलब्ध असल्याचेही चौहान यांनी सांगितले. पाचही दिवस तापमान सारखे राहील. सामन्यावर ढगाळ वातावरणाचे सावट कायम असेल पण पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.>उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा आणि कुलदीप यादव. राखीव : शुभमन गिल, हनुमा विहारी, रिषभ पंत.बांगलादेश : मोमिनुल हक (कर्णधार) , इमरूल कायेस, मुशफिकूर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मोहम्मद मिथून, लिटन दास, मेहिदी हसन मिराज, मुस्ताफिजूर रहमान, नईम हसन, सैफ हसन, शादमान इस्लाम, तैजुल इस्लाम, अबू जायेद, इबादत हुसैन आणि मुसद्दक हुसैन सैकत.>‘या मैदानावर भारतीय संघाच्या अनेक आनंददायी स्मृती आहेत. कसोटी विजयासाठी या स्मृतींपासून प्रेरणा घेऊ. होळकर स्टेडियम आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. येथे खेळाचा आनंद लुटताना बांगलादेशच्या खेळाडूंना आम्ही कमकुवत मानण्याची चूक करणार नाही. भारताला आपल्या खेळाडूंवर विश्वास आहे. येथे १५ वर्षांपासून आमचा संघ सर्व प्रकारात अपराजित आहे.’- विराट कोहली, कर्णधार