IND vs AUS : रोहितनं घेतली गळाभेट, किंग कोहलीनं थोपटली पाठ! युवा कॅप्टन गिलचा खास व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाल्यावर गिल-रोहितची पहिली भेट, खास व्हिडिओमध्ये कोहलीही दिसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:27 IST2025-10-15T19:15:55+5:302025-10-15T19:27:29+5:30

whatsapp join usJoin us
Indian Team Captain Shubman Gill Meet Rohit Sharma And Virat Kohli BCCI Posted Video Going For Australia Series IND vs AUS 2025 | IND vs AUS : रोहितनं घेतली गळाभेट, किंग कोहलीनं थोपटली पाठ! युवा कॅप्टन गिलचा खास व्हिडिओ व्हायरल

IND vs AUS : रोहितनं घेतली गळाभेट, किंग कोहलीनं थोपटली पाठ! युवा कॅप्टन गिलचा खास व्हिडिओ व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Team Captain Shubman Gill Meet Rohit Sharma And Virat Kohli : घरच्या मैदानातील कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-२- मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन दिग्गज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही दिग्गज आता गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील. भारतीय संघाचे नेतृत्व मिळाल्यावर पहिल्यांदाच शुबमन गिल माजी कर्णधार आणि विराट कोहली यांना भेटला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी झालेल्या खास भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

गिल-रोहित यांची पहिली भेट ; BCCI नं शेअर केला खास व्हिडिओ


 
भारतीय संघाची पहिली बॅच १४ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. दरम्यान बीसीसीआयने नवा कर्णधार आणि माजी कर्णधार यांच्यातील खास क्षण दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शुबमन गिल हिटमॅन रोहित शर्माकडे जाताना दिसते. त्याला पाहिल्यावर रोहित शर्मा काय कसा आहेस? अशी विचारपूस करतो. एवढेच नाहीतर गळाभेट घेत तो नव्या कर्णधारासोबतचं आपल खास बॉन्डिंग दाखवून देताना पाहायला मिळते.

Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत

कोहलीनं थोपटली पाठ

रोहित शर्माची भेट घेतल्यावर शुबमन गिल थेट टीम बसमध्ये गेला. जिथं विराट कोहलीनं हस्तांदोलन करत त्याचे स्वागत केल्याचे पाहायाला मिळाले. यावेळी किंग कोहलीनं युवा आणि नवा कर्णधार शुबमन गिलची पाठही थोपटल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडिओमध्ये वनडे संघाचा उप कर्णधार श्रेयस अय्यरची झलकही पाहायला मिळते. 

कसोटीनंतर वनडेतही नवे पर्व 

इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.  इंग्लंड दौऱ्यातील  तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसाठी झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून गिलनं कॅप्टन्सीच्या नव्या इनिंगची सुरुवात केली.  ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आता वनडे संघाची धूराही शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. दिग्गजांशिवाय इंग्लंड दौरा गाजवल्यावर यावेळी तो दोन दिग्गजांसाठीनं आपल्या कॅप्टन्सीचा आणखी एक नवा अध्याय सुरु करेल.     

 

Web Title : IND vs AUS: रोहित का गले लगना, कोहली ने कप्तान गिल को थपथपाया!

Web Summary : ऑस्ट्रेलिया दौरे से पहले, शुभमन गिल रोहित शर्मा और विराट कोहली से मिले। रोहित ने गिल को गले लगाया, जबकि कोहली ने युवा कप्तान को थपथपाया, गिल के टीम का नेतृत्व करने पर समर्थन दिखाया।

Web Title : IND vs AUS: Rohit's hug, Kohli's pat for Captain Gill!

Web Summary : Ahead of Australia tour, Shubman Gill met Rohit Sharma and Virat Kohli. Rohit hugged Gill, while Kohli patted the young captain, showing support as Gill leads the team.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.