Join us  

Womens T20 Cricket 2018 : विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, मुंबईकर जेमिमाला संधी

वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला ट्वेंटी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 4:26 PM

Open in App

मुंबई : वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला ट्वेंटी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केलेल्या या संघात मुंबईच्या जेमिमा रॉड्रीग्जला संधी मिळाली आहे. 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे, तर महाराष्ट्रीची स्मृती मनधाना उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणार आहे.  सहावी महिला ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धा 9 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताला B गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि आयर्लंडचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघ पहिला सामना गयाना येथे 9 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. भारताचे वेळापत्रक9 नोव्हेंबर : भारत वि. न्यूझीलंड 11 नोव्हेंबर : भारत वि. पाकिस्तान15 नोव्हेंबर : भारत वि. आयर्लंड17 नोव्हेंबर : भारत वि. ऑस्ट्रेलियाभारतीय संघ : हरमनप्रीत कौर, स्मृति मनधाना, मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, वेदा कृष्णमूर्ति, दीप्ति शर्मा, तान्या भाटिया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटिल, एकता बिष्ट, डी. हेमलता, मानसी जोशी, पूजा वास्त्राकर आणि अरुंधती रेड्डी.

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेट 2018वेस्ट इंडिजटी-20 क्रिकेटभारतीय महिला क्रिकेट संघ