Join us  

भारतीय संघात वर्चस्व गाजवण्याची क्षमता, इयान चॅपेल यांचे मत

Indian Cricket team : प्रतिभावान खेळाडू व गेल्या काही वर्षांतील यशाचा विचार करता भारत विश्व क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजविण्याची शक्यता आहे. त्यात विदेशात यश मिळविण्याचाही समावेश आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 2:24 AM

Open in App

नवी दिल्ली : प्रतिभावान खेळाडू व गेल्या काही वर्षांतील यशाचा विचार करता भारत विश्व क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजविण्याची शक्यता आहे. त्यात विदेशात यश मिळविण्याचाही समावेश आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले. (The Indian team ability to dominate the Cricket, says Ian Chappell)ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार चॅपेल यांनी ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ला लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटले की, ‘ऑस्ट्रेलियामध्ये भारताने अलीकडेच मिळविलेल्या यशामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय मिळविण्याची क्षमता आहे, असा विश्वास खेळाडूंमध्ये निर्माण झाला आहे. संघांना विदेश दौऱ्यात अडचणींना सामोरे जावे लागत असताना भारतात यात बदल करण्यासाठी प्रतिभावान खेळाडू आहे. आता कुठलाही प्रतिस्पर्धी संघ हे सांगू शकत नाही की भारतीय संघ दौऱ्यावर येत असेल तर लांब रनअप असलेल्या वेगवान गोलंदाजांची निवड केली तर मालिका जिंकता येते.’

क्रिकेट जाणकारांना वाटते की, एकेकाळी जसे वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया संघाने वर्चस्व निर्माण केले होते तसे वर्चस्व भारत निर्माण करू शकतो; पण आता तसे करणे अधिक अवघड झाले आहे.  त्यांनी त्यावेळच्या परिस्थितीची आठवण करताना सांगितले की, दोन्ही संघात प्रतिभावान खेळाडूंना अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळविण्यासाठी मेहनत घ्यावी लागत होती. त्यावेळी अनेक प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. सध्या तशीच स्थिती भारतीय संघाबाबत आहे, असेही चॅपेल म्हणाले.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआंतरराष्ट्रीय क्रिकेट