दूल्हे की सालियों...! हार्दिक पांड्याच्या लग्नातला भन्नाट किस्सा; नवीन नवरदेव जरा सांभाळून, Video 

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अन् ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याच्या लग्नातला एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:58 AM2023-06-19T10:58:55+5:302023-06-19T10:59:33+5:30

whatsapp join usJoin us
Indian T20I Team Captain Hardik Pandya offers to pay Rs 5 lakh to get his shoes back at his wedding with Natasa Stankovic. Watch | दूल्हे की सालियों...! हार्दिक पांड्याच्या लग्नातला भन्नाट किस्सा; नवीन नवरदेव जरा सांभाळून, Video 

दूल्हे की सालियों...! हार्दिक पांड्याच्या लग्नातला भन्नाट किस्सा; नवीन नवरदेव जरा सांभाळून, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अन् ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याच्या लग्नातला एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. हार्दिक आणि अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांनी २०२०च्या स्वागत सेलिब्रेशनलाच दुबईत गुपचूप साखरपुडा उरकला. त्यानंतर कोरोना काळात त्यांनी कुटूंबाच्या व्यक्तिंसमक्ष लग्न केलं. पण, २०२३ मध्ये हार्दिक व नताशा यांनी पुन्हा लग्नगाठ बांधली अन् जयपूरमध्ये थाटात लग्न केलं. नताशाने या शाही लग्नाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘Pitch Perfect – Fairy Tale Love Story’ अशी मालिका तिने पोस्ट केलीय. 


या लग्न सोहळ्यात हार्दिकचा भाऊ कृणाल याची पत्नी पंखुरी शर्मा हिने नवरदेवाचे बुटं चोरले आणि त्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंकडे १ लाख रुपयांची मागणी केली. या लग्नात पंखुरी ही नताशाची करवली बनली होती आणि त्यामुळे तिने हार्दिकचे बुटं लपवली. त्या दोघांचा संवाद या व्हिडीओतून स्पष्ट ऐकू येतोय... पंखुरीने पैशांची मागणी करताच हार्दिक म्हणाला, तू सांग, तुला किती रुपये हवेत? त्यानंतर त्याने एका व्यक्तिला पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. ''तिने माझ्याकडे १ लाख रुपये मागितले आहेत, परंतु मी ५ लाख रुपये देतो.'' 



हार्दिक, त्याचा मुलगा अगस्त्य आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या वरातीत नाचताना दिसत आहेत. तिने संगीताच्या तालावर नाचले, काळ्या रंगाची छटा घातली आणि ‘काला चष्मा’ या लोकप्रिय गाण्यावर ती नाचली. या जोडप्याने त्यांच्या लग्न समारंभातील छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले, “आम्ही तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या नवसाचे नूतनीकरण करून या प्रेमाच्या बेटावर व्हॅलेंटाईन डे साजरा केला. आमचे प्रेम साजरे करण्यासाठी आमचे कुटुंब आणि मित्र आमच्यासोबत आहेत हे आम्ही खरोखरच धन्य आहोत.”

Web Title: Indian T20I Team Captain Hardik Pandya offers to pay Rs 5 lakh to get his shoes back at his wedding with Natasa Stankovic. Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.