हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली IPL 2022 मध्ये खेळणाऱ्या गुजरात टायटन्स ( Gujarat Titans Logo) संघाने त्यांच्या लोगोचे रविवारी अनावरण केले. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली. अहमदाबाद फ्रँचायझी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स या नावाने मैदानावर उतरणार आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिकच्या खांद्यावर या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच्यासोबत राशिद खान व शुबमन गिल यांना संघाने ऑक्शनआधी करारबद्ध केले होते.
गुजरात टायटन्स: शुभमन गील,
हार्दिक पांड्या, राशिद खान, जेसन रॉय ( २ कोटी ), मोहम्मद शमी ( ६.२५ कोटी), लॉकी फर्ग्युसन ( १० कोटी), अभिनव सदारंगानी ( २.६० कोटी), राहुल तेवतिया ( ९ कोटी), नूर अहमद ( ३० लाख), साई किशोर ( ३ कोटी), डॉमनिक ड्रेक्स ( १.१० कोटी), विजय शंकर ( १.४० कोटी), जयंत यादव ( १.७० कोटी), दर्शन नलकांडे ( २० लाख), यश दयाल ( ३.२० कोटी), डेव्हिड मिलर ( ३ कोटी), वृद्धीमान सहा ( १.९० कोटी), मॅथ्यू वेड ( २.४० कोटी), अल्झारी जोसेफ ( २.४० कोटी), प्रदीप सांगवान ( २० लाख) , वरुण अॅरोन ( ५० लाख), बी साई सुदर्शन ( २० लाख)