Join us

भारतीय खेळाडूंचा सराव सुरु; कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

Indian Cricket Team: महामारीनंतर पहिल्यांदा खेळणार आंतरराष्ट्रीय मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 02:26 IST

Open in App

सिडनी : भारतीय संघ आणि सहकारी स्टाफ कोरोना चाचणीत नेगेटिव्ह आढळला असून, खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी शनिवारी सराव सुरू केला आहे. नुकतेच यूएईमध्ये इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सहभागी होणारे हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ आणि मोहम्मद सिराजसह अनेक क्रिकेटपटूंनी सराव सत्रात सहभाग घेतला.

बीसीसीआयने ट्विटरवर खेळाडूंचे आऊटडोअर सराव आणि जीम सत्राची छायचित्रे टाकली आहेत. फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज उमेश यादव, अष्टपैलू रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर आणि चेतेश्वर पुजारा यांनी शनिवारी कसून सराव केला. वेगवान गोलंदाज टी. नटराजन आणि दीपक चाहर यांनीदेखील सरावात सहभाग घेतला.

भारतीय संघ सध्या १४ दिवसांच्या अलगीकरणात आहे. त्याआधी भारतीय संघाचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. लेगस्पिनर युझवेंद्र चहल यानेदेखील फिरकी गोलंदाज कुलदीपसोबतचे छायाचित्र ट्विटरवर टाकले आहे. त्याने लिहिले, ‘कुलदीपसोबत भारतीय संघात पुनरागमन. टीम इंडियाचा सराव सुरु.’ 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया