Join us  

भारताच्या वर्ल्ड कप संघात Mumbai Indians चे वर्चस्व! ४ IPL संघांतील एकही खेळाडू नाही

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात IPL फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 5:38 PM

Open in App

Team India Announced for T20 World Cup 2024 :  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात IPL फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची मंगळवारी घोषणा केली गेली. हार्दिक पांड्याने संघातील आपले स्थान आणि उप कर्णधारपद टिकवले आहे. हार्दिकला आयपीएल २०२४ मध्ये फार चांगली कामगिरी करता आलेली नाही, परंतु पूर्व पुण्याईच्या जोरावर त्याने संघातील स्थान टिकवले.

निवड समिती प्रमुख अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची रविवारी नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. त्यानंतर मंगळवारी आगरकर व द्रविड यांनी BCCI चे सचिव जय शाह यांची अहमदाबाद येथे भेट घेतली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड येथे होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान ( ९ जून), अमेरिका ( १२ जून) व कॅनडा ( १५ जून)  असे भारताचे सामने होणार आहेत.  

IPL फ्रँचायझी अन् टीम इंडियातील शिलेदार

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, मोहम्मद सिराज
  • राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल
  • चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा, शिवम दुबे
  • दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल
  • पंजाब किंग्स- अर्शदीप सिंग 
  • अंतिम १५ खेळाडूंमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघातील एकही खेळाडू नाही.

भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स