Join us

T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय खेळाडूंची नावे अखेर बीसीसीआयने जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 22:34 IST

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय खेळाडूंची नावे अखेर बीसीसीआयने जाहीर केले. रिंकू सिंग, शुबमन गिल, आवेश खान व खलिल अहमद हे राखीव खेळाडू म्हणून अमेरिकेला टीम इंडियासोबत जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ भारताचा आयसीसी स्पर्धांचा ११ वर्षांचा दुष्काळ यंदा तरी संपवेल अशी अपेक्षा आहे. पण, या संघातील काही खेळाडूंवरून नाराजी व्यक्त केली जात आहे. वर्ल्ड कप संघ जाहीर झाल्यानंतर संधी मिळालेल्या खेळाडूंची आयपीएल २०२४ मधील कामगिरी मात्र घसरल्याचे पाहायला मिळतेय...

भारतीय संघाचे लीग सामने न्यूयॉर्कला होणार आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड येथे होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान ( ९ जून), अमेरिका ( १२ जून) व कॅनडा ( १५ जून)  असे भारताचे सामने होणार आहेत.  भारतीय संघाचे न्यूयॉर्कमध्ये शिबिर घेण्यात येणार आहे.  इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा साखळी सामन्यांचा टप्पा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ मे रोजी भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी अमेरिकेला रवाना होईल. जे खेळाडू आयपीएल २०२४ प्ले ऑफसाठी पात्र ठरलेल्या संघांचा भाग नसतील, ते पहिल्या बॅचमध्ये असतील. २६ मे रोजी आयपीएल फायनल संपल्यानंतर दुसरी तुकडी अमेरिकेला रवाना होईल.

वर्ल्ड कप संघात एन्ट्री अन् आयपीएलमध्ये अधोगती...रोहित शर्मा - ४ ( ५)सूर्यकुमार यादव - १० ( ६) हार्दिक पांड्या - ० ( १) व दोन विकेट्सशिवम दुबे - ० ( २) व एक विकेटरवींद्र जडेजा - २ ( ४) अर्शदीप सिंग - १-५२  

भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024हार्दिक पांड्यारोहित शर्मारवींद्र जडेजा