Join us

Mohammed Siraj : मोहम्मद सिराजच्या घरी पोहोचली 'Mahindra Thar'; आनंद महिंद्रा म्हणतात, तुझ्या कर्तृत्वसमोर ही भेट काहीच नाही 

Indian pacer Mohammed Siraj receiving Mahindra Thar मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. भारतानं ०-१ अशा पिछाडीनंतर ही मालिका २-१ अशी जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 15:50 IST

Open in App

भारतीय संघानं युवा खेळाडूंच्या जोरावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळवलेला ऐतिहासिक कसोटी विजय, हा इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. या कामगिरीची दखल घेत महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख (  Chairman of Mahindra Group) आनंद महिंद्रा यांनी ( Anand Mahindra) टी नटराजन, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी व शुबमन गिल यांना महिंद्रा थार ( Mahindra Thar) गाडी गिफ्ट करण्याची घोषणा केली होती. आनंद महिंद्रा यांनी ते वचन पाळलं आणि आतापर्यंत टी नटराजन, शार्दूल ठाकूर व मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) यांना महिंद्रा थार भेट म्हणून दिली आहे.  IPL 2021 : राज्यात कडक निर्बंध; आयपीएलच्या सामन्यांना महाराष्ट्र सरकारनं दिली परवानगी, पण...

मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. भारतानं ०-१ अशा पिछाडीनंतर ही मालिका २-१ अशी जिंकली. सिराजन या मालिकेत तीन सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आणि भारताकडून या मालिकेत सर्वाधिक विकेट्सचा विक्रमही त्यानं नावावर केला. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होताच सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यानंतरही तो संघासोबत राहिला आणि इतिहास घडवला. त्याला ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या वर्णद्वेषी टीकेचाही सामना करावा लागला होता. Fakhar Zaman Run Out : क्विंटन डी कॉकनं पाकिस्तानी फलंदाजाचा 'पोपट' केला, मोठा वादच निर्माण झाला; Video

रविवारी मोहम्मद सिराजच्या  घरी महिंद्रा थार पोहोचली आणि भारतीय गोलंदाजानं आनंद महिंद्रा यांचे आभार मानले. तो म्हणाला,''या क्षणाला नक्की काय बोलू, हेच सुचत नाही. ही भेट मिळाल्यानंतर किती आनंद झालाय, हे मी व्यक्त करू शकत नाही. मी आनंद महिंद्रा सर यांचे आभार मानतो. ''  आनंद महिंद्रांनी रिप्लाय दिला की,''तू तुझ्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यानं आम्हाला आनंदीतही केलं. खरं तर  तुझ्या कर्तृत्वाचे मोजमाप कोणत्याच गिफ्ट मध्ये करता येणार नाही.''

टॅग्स :मोहम्मद सिराजआनंद महिंद्राभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया